मुंबई : भारतीय रेल्वे प्रवासाचा अनुभव बदलणाऱ्या ‘मेक इन इंडीया’ अंतर्गत तयार झालेल्या वंदेभारत एक्सप्रेसची ( vandebharat ) प्रतिक्षा आता सोलापूर, पुणे आणि नाशिककरांना लागली आहे. येत्या दहा फेब्रुवारीला ही आलिशान एक्सप्रेस सीएसएमटीहून सोलापूर आणि साईनगर- शिर्डीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NarendraModi ) यांच्या हस्ते उद्घाटन होऊन रवाना होणार आहे. शिर्डी आणि पंढरपूर ही दोन तीर्थ क्षेत्रे या दोन वंदेभारतनी जोडली जाणार आहेत. परंतू खरेच वंदेभारत विमान ( airplane ) प्रवासासारखी लक्झरीयस आहे का ? यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( AshwiniVaishnaw ) यांनी वंदेभारत एक्सप्रेस मधील बाळाचा एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
येत्या दहा फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सोलापूर आणि शिर्डी अशा दोन वंदेभारतचा शुभारंभ होणार आहे. राज्यातल्या राज्यातच चालणाऱ्या दोन वंदेभारत मिळणारे महाराष्ट्र हे पहीलेच राज्य ठरणार आहे. कारण आता पर्यंत देशातील इतर राज्यात सुरू झालेल्या वंदेभारत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात मात्र राज्यातल्या एका शहरातून दुसऱ्या शहरात वंदेभारत धावणार आहे.
वंदेभारत एक्सप्रेसचा वेग हाच एकमेव युएसपी आहे. कारण ही गाडी दर तासाला 180 किमी वेगाने धावण्यासाठी बनविण्यात आली आहे. या गाडीला इंजिन लेस गाडी म्हणतात, कारण इतर लांबपल्ल्याच्या गाड्या प्रमाणे तिला स्वतंत्रपणे इंजिन जोडावे लागत नाही. अशा गाडीतील इंटेरीयर फ्लाईट सारखे आहे. आसने पुशबॅकवाली असल्याने पाठीला आराम मिळतो. या ट्रेनला केवळ चेअरकार आहेत. त्यामुळे अधिक आरामदायी आसने दिली आहेत. तसेच एक्झुकेटीव्ह क्लासती आसने विविध कोनातून फिरतात. त्यांनी लेग रेस्टची सोय आहे.
वंदेभारत ट्रेनच्या आसनांवर पहुडलेल्या एका बाळाचा फोटो रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. आणि ही प्लेनची सीट आहे की ट्रेन सीट अशी त्याला साजेशी कॅप्शन दिली आहे. मागे रेल्वेमंत्र्यानी या ट्रेनच्या आतील आसनांवर पाण्याचे काठोकाठ भरलेले ग्लास ठेवून ती ताशी 160 किमीच्या वेगाने धावत असूनही ग्लासाचे पाणी जराही डचमळत नसल्याचा व्हिडीयो पोस्ट केला होता. त्यालाही ट्वीटरवर खूप प्रतिक्रीया मिळाल्या होत्या.
Baby On Board!
Plane seat or train seat?
Guess ⁉️ pic.twitter.com/x5snDfHADb— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 3, 2023
वंदेभारतचा वेग जरी 180 किमीचा असला तरी रेल्वेच्या रूळांची क्षमता कमी असल्याने ही ट्रेन पूर्ण वेग क्षमतेने धावण्यात अडचणी आहेत. या गाडीला चांगल्या दर्जाची शॉर्क ऑब्जर्व यंत्रणा बसविली आहे. धक्के सहन करीत असल्याने प्रवासात फारसे धक्के बसत नाहीत, हे दर्शविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी हा फोटो पोस्ट केल्याचे म्हटले जात आहे.