बिहार : बिहारमधील लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Bihar Viral News) पाहायला मिळतात. मुळात बिहारमधील सध्या लग्नात झालेला प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आला आहे. लग्नात अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळतं. काहीवेळेला अशी स्थिती असते की, लग्नात हुंडा न मिळाल्यामुळे नवरदेव लग्नाला नकार देतात. तर काहीवेळेला अचानक नवऱ्याने हुंडा मागितल्यामुळे त्याला मारहाण सुध्दा झाली आहे. सध्या जो प्रकार घडला आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या (Bihar Trending News) विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नवरा नकली केस (duplicate hair) लावून नवरीच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.
बिहार राज्यातील गया जिल्ह्यात एक घटना घडली आहे. नवरा नकली केस लावून दुसरं लग्न करण्यासाठी गेला होता. लग्न मंडपात लग्नाच्या आगोदर सगळा प्रकार उजेडात आला. हा प्रकार ज्यावेळी नवरीकडच्या लोकांना समजला, त्यावेळी त्यांनी नवरदेवाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये नवरा त्या लोकांची हात जोडून माफी मागत आहे. पण नवरीकडची लोकं त्याला मारहाण करीत आहेत. नवरीकडच्या लोकांनी सांगितलं की, त्या व्यक्तीचं टक्कल आहे, त्याचबरोबर तो दुसरं लग्न करत होता. त्यामुळं चिडलेल्या लोकांनी त्याला मारहाण केली.
Bald groom thrashed fiercely after being exposed in Gaya, the man had reached for second marriage by wearing fake hair. The case is of Bajaura village under Dobhi police station. Video viral on social media.
#Gaya #ViralVideo #Bihar #BiharPolice pic.twitter.com/UzvsxOGAhL— Siraj Noorani (@sirajnoorani) July 12, 2023
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती पुर्णपणे लग्नासाठी तयारी करुन आली आहे. त्या व्यक्तीला व्हिडीओत पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा अंदाज लावू शकता. त्या व्यक्तीच्या बाजूला एक मुलगा बसला आहे, तो रडत आहे. नवरीकडचे नातेवाईक इतके संतप्त झाले आहेत की, त्यांच्यातला एक व्यक्ती होणाऱ्या नवरदेवाला मारहाण करीत आहे. त्या व्हायरल व्हिडीओत आवाज सुध्दा येत आहे की, तिथला एक न्हावी बोलवून त्याचे केस कापूया, त्यानंतर नवरदेव सगळ्यांची हात जोडून माफी मागत आहे.