आजकाल ऑनलाइनचा जमाना आहे. आपल्यापैकी अनेक जण बरंच सामान, वस्तू, ऑनलाइन ऑर्डर करत असतात, बंगळुरूमधील एक जोडप्यानेही असंच ऑनलाइन सामान मागवलं. ॲमेझॉनवरून त्यांनी काही वस्तू ऑर्डर केल्या, पण डिलीव्हरी झाल्यावर जेव्हा त्यांनी सामानाचा बॉक्स उघडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांची दातखिळीच बसली. तो बॉक्स उघडताच त्यांच्यासमरो एक कोब्रा (साप) फुत्कार टाकताना दिसला, ते पाहून त्या जोडप्याची भीतीने गाळण उडाली. ॲमेझॉनवरून आलेल्या सामानात साप असल्याचा दावा त्या जोडप्याने केला असून त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. त्यांच्या नशीबाने तो साप त्या बॉक्सच्या टेपला (चिकटपट्टी) चिकटला होता, त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. अन्यथा तो मोकळा असता तर कोणाला चावूही शकला असता. या घटनेचा व्हिडीओ शूट करून त्या जोडप्याने तो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या घटनेमुळे ई-कॉमर्स कंपन्यांचे पॅकेजिंक आणि डिलीव्हरी प्रक्रियेवरून नवा वाद सुरू झाला आहे.
या जोडप्याच्या सांगण्यानुसार, त्यांनी दोन दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरून एक्सबॉक्स कंट्रोलर ऑर्डर केला होता, परंतु त्यांनी पॅकेट उघडण्याचा प्रयत्न करताच आतमध्ये जिवंत साप पाहून त्यांना धक्काच बसला. सर्जापूर रोड येथील रहिवासी असलेल्या या जोडप्याने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केल्याचे नमूद केले. तेथे एक एक प्रत्यक्षदर्शीही आहे.
सुदैवाने साप पॅकेजिंग टॅपमध्ये अडकला, अन्यथा आमच्या घरातील किंवा अपार्टमेंटमधील इतर लोकांना त्रास होऊ शकला असता. एवढ्या मोठ्या निष्काळजीपणानंतरही ॲमेझॉन त्यांचे ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कस्टमर केअरच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना दोन तास फोनवर अडकवून ठेवले. मग तुम्ही स्वतःच ही परिस्थिती हातळा असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्या जोडप्याला नाहक त्रासाचा सामना करावा लगल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
#सावधान_इंडिया #अमेजन #जिंदा_सांप
कर्नाटक के बेंगलुरु में महिला ने ऑर्डर किया अमेजोन से और डिलीवरी बॉक्स से निकला जिंदा कोबरा सांप।उपर वाले का शुक्र है की उस महिला और डेलिवरी बॉय को कुछ नहीं हुआ, बाल बाल बचा दोनों ।।@amazonIN @AltNews जरा खबर की पुष्टि कीजिए..@007AliSohrab pic.twitter.com/C2M0zJBw83
— Sohail Rahmani (@sohailrahmani66) June 18, 2024
पैसे परत मिळाले पण
या घटनेनंतर संबंधित जोडप्याला रिफंड तर मिळाला पण पॅकेटमधील सापामुळे त्यांच्या जीवावरच बेतलं होतं, त्याची जबाबदारी कोण घेणार , असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांचं पॅकेजिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी या घटनेनंतर केली जात आहे.