Beggar vs humanity : एखाद्याला मदत करणे हे एक चांगले काम समजले जाते. तुम्ही केलेली छोटीशी मदतही एखाद्याच्या आयुष्यात महत्त्वाची ठरू शकते. आपल्या आजूबाजूला असे अनेक गरजू लोक असतात, जे हतबल असतात. ते स्वत: आपल्या मर्यादांमुळे फारसे काही करू शकत नाहीत. मग त्यांना काही वेळेला इतरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र अशांची मदत केल्याने त्यांना समाधान मिळते. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. एक प्रेरणा देणारा असा हा व्हिडिओ वडील-मुलगा आणि रस्त्यावरील विक्रेता यांच्यामधील संवादाचा आहे. मानवतेचा संदेश देणारा असा हा व्हिडिओ आहे. दिव्यांग असलेले वडील त्याच्या लहान मुलासोबत व्हीलचेअरवरून जात असतात. वडिलांना तहान लागलेली असते. यावेळी हा चिमुरडा आपल्या वडिलांसाठी काय करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील विक्रेता काय करतो, हे यात दाखवले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे, वडिलांना तहान लागली म्हणून मुलाला जवळच हापसा दिसतो. मग तो ओंजळीत पाणी आणतो पण ओंजळीत ते राहत नाही. मग तो जवळच्याच एका विक्रेत्याकडे जातो आणि त्याला म्हणतो, की माझे वडील चालू शकत नाहीत. त्यांना खूप तहान लागली आहे. एखादे भांडे द्या. पण तो विक्रेता त्याला रागावतो आणि जायला सांगतो. पण पुन्हा त्याला थांबवतो आणि मुलाला म्हणतो, हा जग आपल्या वडिलांना दे. मग तो मुलगा आपल्या वडिलांना तो पाण्याचा मग देतो. पुढे काय होते, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा…
यूट्यूबवर विजयकुमार विनर व्ह्लॉग्स (Vijay Kumar Viner Vlogs) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. सहा मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘It is not necessary to help someone by showing it Beggar vs humanity‘ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आणि विशेषत: यातला लहान मुलगा खूप आवडला आहे.