थिंपू : जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिंबधक लसीकरण सुरु आहे. मात्र, काही देश गरीब असल्यामुळे किंवा त्या देशात कोरोना लस न पोहोचल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ही गोष्ट लक्षात घेता भारत इतर अनेक देशांना लसीचा पुरवठा करतोय. आपला शेजारी देश भूतानलासुद्धा भारताने कोरोना लसीचा पुरवठा सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर भूतानमधील या छोट्याशा मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीने आपल्या गोड आवाजात भारताचे आभार मानले आहेत. (Bhutan little girl thanking India for providing Corona vaccine video goes viral)
भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भूतानची एक छोटी गोड मुलगी हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलत आहे. हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करुन नंतर ती इंग्रजीमध्येसुद्धा बोलते. या मुलीचे नाव खेनरब येडझिन सिल्डेन (Khenrab Yeedzin Syelden) असून ती भारत सरकारचे आभार मानत आहे. भूतान देशाला कोरोना प्रतिबंधक लसी दिल्यामुळे ही मुलगी भारताचे आभार मानत आहे. या व्हिडीओच्या शेवटी ही छोटी मुलगी हिंदीमधून धन्यवाद भारत म्हणून भारताचे आभार मानते. #VaccineMaitri अभियानांतर्गत भारत सरकारने भूतानला लसीचा पुरवठा केला होता.
Khenrab! Your ‘thank you’ touches our hearts! #VaccineMaitri #indiabhutanfriensdhip. pic.twitter.com/2JOnCHVQ5a
— Ruchira Kamboj (@RuchiraKamboj) March 26, 2021
दरम्यान राजदूत रुचिरा कंबोज यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात लाईक केलं जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओल 10 हजार लोकांना पाहिलं असून अनेकांनी या व्हिडीओला रिट्विटसुद्धा केलं आहे. या छोट्या मुलीचं लडीवाळ बोलणं, दोन्ही हात जोडून भारताचे धन्यवाद माणणं अनेकांना चांगलंच आवडलं आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :
(Bhutan little girl thanking India for providing Corona vaccine video goes viral)