Millionaire Speaks : अब्जाधीशाने सांगितला श्रीमंतीचा मंत्र, फक्त बदला या तीन सवयी

| Updated on: Oct 05, 2023 | 2:49 PM

Millionaire Speaks : स्वतःच्या बळावर अब्जाधीश झालेल्या या व्यक्तीने श्रीमंत होण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. या तीन गोष्टी टाळल्या तरी तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करु शकाल. तसेच तुमचा नाहक होणाऱ्या खर्चाला कात्री लागेल. या श्रीमंत व्यक्तीने दिलेला हा कानमंत्र तुम्ही जपून ठेवल्यास फायद्यात रहाल.

Millionaire Speaks : अब्जाधीशाने सांगितला श्रीमंतीचा मंत्र, फक्त बदला या तीन सवयी
Follow us on

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : लॉटरी जिंकून ही अनेक लोक नंतर कंगाल होतात. त्यांच्याकडे जितक्या झपाट्याने पैसा येतो, तितक्याच लवकर तो निघूनही जातो. करोडपती (Crorepati) होण्याच्या कार्यक्रमात जिंकलेल्या व्यक्ती नंतर पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. कारण पैसा आला तरी त्याचे व्यवस्थापन येणे, ते माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर पैशाला हजार वाटा असतात. तुम्ही त्याचे नियोजन केले नाही. त्याची गुंतवणूक केली नाही तर पैसा हातात टिकत नाही. तर अनेकांना श्रीमंत होण्यासाठी मदत करणाऱ्या एका अब्जाधीशाने पैशांचा योग्य वापर कसा करावा आणि श्रीमंत (Rich Person) कसं व्हावं यावर भलमोठं नाही तर अवघ्या तीन वाक्यात सार सांगितला आहे. या श्रीमंत व्यक्तीने दिलेला हा कानमंत्र तुम्ही जपून ठेवल्यास फायद्यात रहाल.

कोण आहेत सीईओ ब्रायन क्रेन

याहूच्या रिपोर्टनुसार, ब्रायन क्रेन हे स्प्रेड ग्रेट आयडियाज या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी इतर चार मल्टी मिलियन कंपन्या सुरु करण्यासाठी मदत केली आहे. अनेकांना श्रीमंत होण्यासाठी सल्ला दिला आहे. त्यांच्याकडे पाहुन कोणाला पण त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येणार नाही. त्यांच्या मते श्रीमंत होण्याच्या प्रवासात काही गोष्टी मनाशी पक्क्या बांधून ठेवणे गरजेच्या आहे. तुम्हाला स्वयं आर्थिक शिस्त नसेल तर कदाचित तुम्ही श्रीमंत व्हालही पण ही श्रीमंती किती दिवस टिकेल हे सांगता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

काय मिळाला धडा

यापूर्वी त्यांनी त्यांची एक कंपनी विकली. त्यानंतर गुंतवणुकीचे काही तिरसट निर्णय घेतले. त्यांचे अंदाज चुकले. त्यांची संपत्ती झपाट्याने घसरली. ते जणू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले. पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी आर्थिक शिस्त भिनवली आणि आज ते पुन्हा यशस्वी ठरले. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होण्याची, पैसा कमाविण्याची सुप्त इच्छा असते. काहींना मेहनतीने, नशीबाने पैसा मिळतो. पण सर्वांना हे सूख मानवतेच असे नाही. काहींचे निर्णय चुकतात. त्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे या धड्यातून प्रत्येकाने काही ना काही शिकावे असे त्यांना वाटते.

काय दिला मंत्र

ब्रायन क्रेन यांनी श्रीमंत होताना तीन गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, श्रीमंत होण्याच्या प्रवासात सर्वात महत्वाचे आहे की तुम्ही नाहक, वायफळ खर्च करता कामा नये. आलिशान ब्रँडच्या वस्तू खरेदीसाठी, आलिशान घर, बंगला घेण्यासाठी, मनोरंजन आणि अत्याधिक आरामाच्या वस्तूंवर, सेवांवर तुम्ही वायफळ खर्च टाळायला हवे. तुमची ती लाईफस्टाईल बनता कामा नये. महागडे कपडे घालून सोशल मीडियावर पोस्ट करणे चांगले वाटत असले तरी या वायफळ खर्चाने बजेट तर बिघडेलच पण तुमचा कामावरचा फोकस, लक्ष पण राहणार नाही.