Nature Really is incredible : एक काळ असा होता की सगळीकडे फक्त हिरवाई दिसत होती. झाडांनी भरलेलं जग आणि त्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट. विशेषत: सकाळच्या वेळी अशी दृश्यं पाहून मन प्रसन्न होऊन जातं आणि पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिवाट ऐकला की मग वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं. ही दृश्यं आजही खेड्यापाड्यात अधूनमधून पाहायला मिळतात, मात्र शहरांमध्ये त्यांची जागा वाहनांच्या आवाजानं, फटाक्यांच्या आवाजानं आणि हॉर्ननं घेतली आहे. शहरांमध्ये झाडं-वनस्पतींचाही तुटवडा आहे, त्यामुळे झाडं(trees)च नसतील तर पक्षी (Birds)कुठं राहतील, हे उघड आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक पक्ष्यांचा अतिशय अप्रतिम व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला प्रसन्न झाल्यासारखं वाटेल. तुम्ही खूश व्हाल.
झाडं आणि पक्षी
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शहराचा आहे, जिथं झाडावर अनेक पक्षी बसले आहेत. जेव्हा ती झाडावरून उडू लागतात, तेव्हा तुम्हाला ते विलक्षण दृश्य पाहायला मिळते, ज्याची तुम्हाला अपेक्षाही नसते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हवा नसल्यानं झाड स्तब्ध आहे, परंतु काही सेकंदात जेव्हा पक्ष्यांचा कळप त्यांच्या किलबिलाटानं त्यावरून उडू लागतो तेव्हा एक अद्भुत दृश्य दिसून येतं. झाड बघून अजिबात वाटत नाही, की त्यावर इतके पक्षी बसले असावेत.
ट्विटर हँडलवर शेअर
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, की लहानपणी, जेव्हा सर्व पक्षी संध्याकाळी झाडांवर परतायचे, तेव्हा आम्ही त्यांचे गोड स्वर ऐकायचो. शहरांमध्ये अशी विहंगम आणि मनाला भिडणारी दृश्यं नशिबानं क्वचितच पाहायला मिळतात.
बचपन में शाम होते ही जब सारे पंछी पेड़ों पर वापस आ जाते थे, हम उनका मधुर कलरव सूना करते थे. शहरों में ऐसे विहंगम और मन खुश कर देने वाले दृश्य कभी-कभार किस्मत से ही देखने को मिलते हैं! pic.twitter.com/HqC3o8jygN
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 28, 2022
लाइक्स आणि कमेंट्स
अवघ्या 8 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचवेळी हे सुंदर दृश्य पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.