मुंबई : हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं मत किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) याने मांडलं होतं. त्याच्यास या विधानावर अजय देवगन याने प्रतिक्रिया दिली आहे. “सुदीप माझ्या भावा, तुझ्या अनुसार जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तर तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती आहे आणि कायम राहील. जन गण मन, असं अजय देवगण (Ajay Devgn) म्हणाला आहे. त्याने तसं ट्विट केलं आहे.
अजय देवगणचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे “सुदीप माझ्या भावा, तुझ्या अनुसार जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तर तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती आहे आणि कायम राहील. जन गण मन, असं ट्विट अजय देवगणने केलं आहे.
.@KicchaSudeep मेरे भाई,
आपके अनुसार अगर हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा नहीं है तो आप अपनी मातृभाषा की फ़िल्मों को हिंदी में डब करके क्यूँ रिलीज़ करते हैं?
हिंदी हमारी मातृभाषा और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी।
जन गण मन ।— Ajay Devgn (@ajaydevgn) April 27, 2022
किच्चा सुदीपने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सर, मला वाटतं की माझा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. कदाचित मी माझा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू शकेन. मी तुम्हाला भेटेन तेव्हा मी तो जरूर मांडेन. माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा किंवा वाद घालण्याचा नव्हता. मी असं का करेन?”, असं तो म्हणाला आहे.
Hello @ajaydevgn sir.. the context to why i said tat line is entirely different to the way I guess it has reached you. Probably wil emphasis on why the statement was made when I see you in person. It wasn’t to hurt,Provoke or to start any debate. Why would I sir ? https://t.co/w1jIugFid6
— Kichcha Sudeepa (@KicchaSudeep) April 27, 2022
किचा सुदीप यांने हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असं तो एका कार्यक्रमात म्हणाला. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
अजयने एका मुलाखतीत खुलेपणाने बोलण्यावर आपलं मत मांडलं. रणवीर अलाहबदियाला दिलेल्या एका मुलाखतीत अजय म्हणाला, “बर्याच गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला सतत तुमच्या वजनाबद्दल जागरूक राहावं लागतं, अनेकदा तुम्ही तुमच्या मनातलं मोकळेपणे बोलू शकत नाही. देशात बर्याच गोष्टी घडतात आणि त्या घटनांवर आम्ही बोलतो किंवा मौन बाळगण्याचा पर्याय निवडतो. कारण आमच्या मतांकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. जरी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असाल तरी ते वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं. लोकांचा एक संघ तुमच्यासोबत असेल आणि आणखी एक मोठा संघ तुमच्यासोबत नसेल आणि तुम्हाला याची भीती वाटू लागते.”