नवी दिल्ली : सार्वजनिक मालमतेचे नुकसान करण्यात अनेक जण आघाडीवर असतात. अथवा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांची संख्या ही काही कमी नाही. पण दिल्लीतील एका घटनेने देशवासीयांचे मने जिंकली आहेत. मेट्रोमध्ये (Metro) चुकून त्याच्याकडून अन्न खाली पडले. तेव्हा या मुलाने त्याच्याकडील रुमालानेच संपूर्ण डब्ब्याचा फ्लोअर (Floor) स्वच्छ केला. या मुलाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.
लिंक्डइन (LinkedIn) वर दिल्ली (Delhi) मेट्रो (Metro) मधील फ्लोअर स्वच्छ करणाऱ्या एका मुलाची पोस्ट ऑनलाईन व्हायरल झाली आहे. तुम्हाला वाटत असेल नेटवर काही ना काही व्हायरल होत असतं. पण ही पोस्ट अनेकांच्या मनाला भावली. कारण या मुलाने कृतीतून दिलेले उत्तर सर्वांनाच आवडले.
या मुलाकडून मेट्रोच्या फ्लोअरवर अन्न सांडते. दुसरा कोणी असता तर त्याने ते अन्न तसेच पडू दिले असते. जबाबदारी झटकली असती. पण मेट्रो ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे त्याला भान होते. त्याने लागलीच स्वतःचा रुमाल काढून फ्लोअरव पडलेला अन्न स्वच्छ केले.
व्हायरल झालेल्या लिंक्डइनवरील ही पोस्ट आशू सिंह यांनी शेअर केली आहे. या वापरकर्त्याने दिल्लीतील मेट्रोमधील फ्लोअरवर पडलेले अन्न साफ करताना या अज्ञात मुलाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये तो मुलगा दिसून येतो. तो हातातील रुमाने फ्लोअर साफ करताना दिसतो.
पोस्टनुसार, हा मुलगा बॅगतून पिण्याच्या पाण्याची बॉटल काढत होता. त्यावेळी त्याचा टिफिन बॉक्स फ्लोअरवर पडला. त्यातून अन्न फ्लोअरवर सांडले. त्यानंतर मुलाने हे अन्न कोणाच्या पायाखाली येऊ नये आणि मेट्रोत अस्वच्छता नसावी यासाठी सफाई मोहिम हाती घेतली.
या मुलाचा टिफिन बॉक्स खाली पडल्यावर त्यातून अन्न खाली सांडले. हे अन्न उचलण्यासाठी त्याने अगोदर त्याच्या रजिस्टरमधील, वहीमधील पान फाडले. त्याने अगोदर फ्लोअर स्वच्छ केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या रुमालाने फ्लोअर स्वच्छ केला.
त्यानंतर या पोस्टवर वाचकांच्या उड्या पडल्या. नेटकऱ्यांनी या मुलांवर कौतुकाचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले. त्याने केलेली कामगिरी अनेकांना आवडली. सार्वजनिक मालमत्तेचे महत्व या मुलाने पटवून दिल्याचा अनेकांनी दावा केला. तसेच हा मुलगाच स्वच्छ भारत मिशनचा खरा ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचे कौतुक केले.