Desi Jugaad : पावसाळ्याचे दिवस अजून दूर आहेत. मात्र आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे रस्त्यावर नेहमीच पाणी साठलेले असते. कधी कधी हे पाणी इतके घाण असते, की आपण त्याला पारही करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बाहेर पडल्यावर आपली पावले आपोआप थांबतात. पण रस्त्यावर कितीही चिखल आणि पाणी तुंबले तरी काम तर थांबायला नको. अडचणींवर मात करणारे अनेकजण आपल्या देशात आहेत. हे लोक असा काही जुगाड करतात, की कामही होते आणि असे व्हिडिओ पाहणाऱ्याला हसूही येते. आजकाल एका मुलाचा (Child) व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, जो मातीने भरलेल्या गल्लीत सायकलवरून (Cycle) काही वस्तू घेऊन जात आहे. आपल्यापैकी कोणी असे केले असते, तर घसरून पडलो असतो. पण या मुलाची करामत पाहा, ज्या पद्धतीने तो सायकल घेऊन जात आहे, त्याला पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पाणी आणि चिखल असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलाची स्वतःची सायकल आहे, ज्याच्या मागे काही वस्तू ठेवल्या आहेत, तो चिखलमय रस्ता पाहून अजिबात घाबरत नाही, तर त्याच्या सायकलच्या मदतीने भिंतीवर चढतो आणि चिखलाचा रस्ता अगदी सहज पार करतो. 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी स्वाती लाक्रा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. याला 43 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, यासोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
Caption this! pic.twitter.com/hk4htXsk73
— Swati Lakra (@SwatiLakra_IPS) March 23, 2022
जेव्हा लोकांनी या मुलाची प्रतिभा पाहिली तेव्हा त्यांना ते खूप आवडले. अनेक यूझर्सनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘जेथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो..! एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की हा मुलगा फिजिक्सचा प्रोफेसर आहे. तर दुसऱ्या यूझरने या मुलाला गावातील स्पायडर मॅन म्हटले आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर आपले मत मांडले आहे.