कसलंय बुवा हे अजब उपकरण; प्रियकराने गर्लफ्रेंडच्या खोलीतील ‘ते’ फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट, उत्तर वाचून अनेक जण बेशुध्द!

| Updated on: Mar 20, 2025 | 4:39 PM

Secret Device in Girlfriend Room : सोशल मीडिया केवळ मनोरंजनापूरतेच मर्यादीत नाही. प्रियकराने गर्लफ्रेंडच्या रूममधील ते फोटो सोशल मीडियावर टाकून लोकांकडून मदत मागितली. त्यावरील कमेंट पाहून अनेकांना धक्का बसला. काय सापडलं त्या खोलीत?

कसलंय बुवा हे अजब उपकरण; प्रियकराने गर्लफ्रेंडच्या खोलीतील ते फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट, उत्तर वाचून अनेक जण बेशुध्द!
विचित्र उपकरण
Image Credit source: गुगल
Follow us on

समाज माध्यमं (Social Media) आता केवळ मनोरंजनासाठीच उरली नाही. आता अनेक जण या प्लॅटफॉर्मवर प्रश्न, शंका सुद्धा विचारत आहेत. हे सल्ले सार्वजनिक असल्याने त्यावर चर्चा होते. चांगले मंथन होते आणि ठोस असे काही तरी हाती लागते. एका मुलाने Reddit वर अशीच एक माहिती विचारली. त्याने गर्लफ्रेंडच्या खोलीतील फोटो शेअर करत माहिती विचारली. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. तर काहींनी असे प्रकारही घडतात म्हणून धक्का बसल्याचे सांगितले.

काय विचारली माहिती?

तर या तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडच्या खोलीत बेडजवळ एक विचित्र उपकरण दिसले. त्याचे डिझाईन त्याला ओळखीचे वाटले नाही. त्याला हे उपकरण एखादा छुपा कॅमेरा वाटला. पण तरीही त्याची शंका दूर होईना. याचे उत्तर त्याने सोशल मीडियावर विचारले. त्याने त्या डिव्हाईसचे, उपकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने त्या उपकरणाची छायाचित्रे Reddit च्या r/Whatisthis या ग्रुपवर पोस्ट केली. त्यानंतर त्याच्या मनात कुतुहल जागवणारा प्रश्न केला. त्याने ही वस्तू कॅमेरा आहे का? अशी विचारणा केली. तर त्यासोबत दिसत असलेला बोर्ड सुद्धा काय उपयोगी ठरतो अशी विचारणा त्याने केली

हे सुद्धा वाचा

Found in my gf’s vent. Is this a camera? If so, whats the other board?
byu/KI5DWL inWhatisthis

मग काय मिळाले उत्तर?

या पोस्टवर अनेक Reddit सदस्यांनी त्यांचा अंदाज वर्तवला. काहींनी शंका उपस्थिती केली. त्याआधारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

एका युझर्सने तो एक वाय-फाय कॅमेरा असू शकतो आणि त्यामाध्यमातून कोणी तरी त्याच्या गर्लफ्रेंडवर लक्ष ठेवत असल्याचा दावा केला.

दुसर्‍या सदस्याने ते एखादे सेन्सर असण्याची शक्यता वर्तवली.

काहींनी गर्लफ्रेंड भाड्याच्या घरात राहत असेल तर तिच्या घर मालकाने हा घाणरेडा प्रकार केल्याचा अंदाज सांगितला.

तर काहींनी तो वायफाय कॅमेरा नाही तर एका ठराविक अंतरावरून दृश्य टिपता यावी यासाठीचा कॅमेरा असल्याचा दावा केला. अशा कॅमेऱ्यात एक सेंसर आणि रिसीव्हर असतो.

काही सदस्यांनी ते बेबी मॉनिटर असल्याचे म्हटले.

काही सदस्यांनी हे सल्ले वाचून आणि अंदाज वाचून गरगरायला होत असल्याचे म्हटले आहे.

पण अनेकांनी गर्लफ्रेंडच्या रुममध्ये हे डिव्हाईस काय करतेय असा प्रश्न लावून धरला. जगात असे प्रकार कसे होऊ शकतात. त्यामागे काय हेतू आहे, असे प्रश्न पण विचारण्यात आले. एका मुलीच्या रुममध्ये असे विचित्र उपकरण ठेवण्यामागे काय कारण असू शकते, हे सर्व धक्कादायक असल्याच्या कमेंट्स पडल्या.