Boyfriend on Rent video : आमच्याकडेही पाहा! हातात पोस्टर घेऊन या विद्यार्थ्याला नेमकं म्हणायचंय तरी काय?

| Updated on: Feb 15, 2022 | 11:25 AM

Boyfriend on Rent : 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine day) दिवशी जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करत होते. त्याचवेळी बिहारच्या (Bihar) दरभंगा येथील एका अभियांत्रिकीच्या (Engineering) विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.

Boyfriend on Rent video : आमच्याकडेही पाहा! हातात पोस्टर घेऊन या विद्यार्थ्याला नेमकं म्हणायचंय तरी काय?
हाती पोस्टर घेऊन रस्त्यात उभा असलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी
Follow us on

Boyfriend on Rent : 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाइन डे (Valentine day) या दिवशी जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करत होते. त्याचवेळी बिहारच्या (Bihar) दरभंगा येथील एका अभियांत्रिकीच्या (Engineering) विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. व्हिडिओमध्ये हा विद्यार्थी एका पोस्टरद्वारे अनोख्या पद्धतीने सिंगल्सच्या वेदना व्यक्त करताना दिसत होता. एवढेच नाही तर सिंगल्सना आकर्षित करत या विद्यार्थ्याने अनेक सामाजिक समस्यांना लोकांसमोर आणले. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाई आपापल्या अकाऊंटवर तो मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बिहारमधील दरभंगा येथील आहे. जिथे दरभंगा महाराजांच्या कॅम्पसमध्ये एक मुलगा पोस्टर हातात धरलेला दिसत आहे. या मुलाने पोस्टरवर लिहिले आहे, ‘बॉयफ्रेंड ऑन रेंट.’ एवढेच नाही तर हा मुलगा सिंगल्सच्या व्यथा अगदी अनोख्या पद्धतीने मांडतोच, पण अनेक सामाजिक समस्या मांडण्यासोबतच त्यावर उपायही देतो.

‘तरुणाईत नैराश्य’

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की हा मुलगा पोस्टरसह पाण्याने भरलेल्या रस्त्यावर उभा आहे आणि जवळून जाणारे लोक आश्चर्याने त्याला पाहत आहेत. प्रियांशू असे या मुलाचे नाव असून तो अविवाहित मुलींचा काही काळासाठी का होईना बॉयफ्रेंड बनण्यास तयार आहे. तो दरभंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात पाचव्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. प्रियांशु सांगतो, की आजची तरुणाई नैराश्याला बळी पडत आहे. सिंगल्समध्ये ही सर्वात मोठी समस्या आहे. प्रियांशूच्या मते, या पोस्टरच्या माध्यमातून सिंगल्सचे मनोबल वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.

‘प्रशासनाने पावले उचलावीत’

एवढ्या घाणेरड्या जागी पोस्टर लावून का उभा राहिलात, असे प्रियांशूला विचारले असता, या भागाची स्थिती चांगली नसल्याचे तो सांगतो. या पोस्टरच्या माध्यमातून त्यांना लोकांचे लक्ष वेधून ही समस्या समोर आणायची होती. याशिवाय प्रियांशू यांनी दरभंगा महाराजांच्या जीर्ण झालेल्या वाड्याबद्दलही चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.

आणखी वाचा :

Viral Video : ‘या’ आजीचं इंग्रजीचं कौशल्य पाहा, खास शैलीचं यूझर्स करतायत कौतुक

जेव्हा Ajay Devgnला राग येतो..! Video Share करत Anand Mahindra म्हणाले, बहुतेक शहर सोडून जावं लागेल..!

अभिनय असावा तर असा! पठ्ठ्या गाडीवर चढून लावतोय जोर, Funny video viral