नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : आजकाल हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून त्यात तरुणांचे प्रमाण जादा आहे. 25 ते 40 वयोगटातील चांगला फिटनेस असलेल्यांनाही हृदयविकाराने मृत्यू होत आहे. परंतू जर फिटनेस गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीलाच जर हार्टअटॅक आणि कार्डीएक अरेस्ट आला तर त्याला काय म्हणावे. असेच आश्चर्यचकीत करणारे प्रकरण घडले आहे. ब्राझील येथील केवळ 33 वयाची फिटनेस गुरु लॅरिसा बोर्जे यांचा कार्डीएक अरेस्टने मृत्यू झाला आहे. त्यांना काही वेळेच्या अंतराने दोन वेळा हार्टअटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानूसार एक आठवडा रुग्णालयात ठेवल्यानंतर सोमवारी लॅरिसा यांचे निधन झाले.
लॅरिसा यांच्या कुटुंबियांनी इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की एखाद्याच्या केवळ 33 व्या वर्षी मृत्यू होणे खूपच दुख:द आहे. लॅरिसा यांनी त्यांच्या जीवनाची लढाई साहसाने लढली परंतू शेवटी हार मानली. लॅरिसा सतत फिटनेसवर काम करायची आणि त्यावर आधारित व्हिडीओ बनवायतची असे या पोस्टमध्ये कुटुंबियांनी तिला श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
लॅरिसा यांना 20 ऑगस्ट रोजी हार्टअटॅक आल्यानंतर रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले होते. ज्यावेळी त्यांना हार्टअटॅक आला त्यावेळी त्या प्रवास करीत होत्या. कार्डीएक अरेस्टनंतर त्या कोमात गेल्या. याच दरम्यान त्यांना आणखी एक अटॅक आला आणि त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नसले तरी प्राथमिक तपासात कळले की हार्ट ब्लॉक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या मृतदेहाला पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे.
अहवालात असेही स्पष्ट झाले आहे की लॅरिसा यांनी काही ड्रग्स आणि मद्याचेही सेवन केले होते. त्यामुळे याचा तपास केला जात आहे की त्यांनी नेमके काय खाल्ले आणि पिले होते. लॅरिसा या नेहमीच आपले शेड्युल , फिटनेसबद्दल युजर्सना इंस्टाग्रामवर अपडेट करीत असायची. ती फॅशन आणि ट्रॅव्हल्स संबंधीत पोस्टही शेअर करायची. लॅरिसा यांचे इंस्टाग्रामवर सुमारे 30 हजार फॉलोअर होते.