नवी दिल्ली: जगामध्ये अनेक प्रथा परंपरा सुरु असतात, ज्याबद्दल माहिती वाचून आपल्यलाला आश्चर्याचा धक्का बसेल. जगाती काही ठिकाणी सुरु असलेल्या परंपरांविषयी समजल्यानंतर आपल्याला धक्का बसतोय. ब्रिटनमधील एका गावात अशीच एक पंरपरा सुरु आहे. त्याविषयी माहिती समजल्यानंतर तुम्हाला प्रथम विश्वास ठेवणं अवघड होऊ शकतं. ब्रिटनच्या त्या गावातील लोक कपडे घातल नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवणे अवघड आहे. एखाद्या वेळी असं वाटेल की तुम्हाला त्या गावकऱ्यांकडे पैसे नसतील गरिबीमुळे ते कपडे घालत नसतील तर तसही नाही. या गावातल्या लोकांकडे पैशाची कमी नाही पण ते कपडे घालत नाहीत. (Britain Village Spielplatz Where People Live Without Clothes)
यूरोपातील ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर येथील स्पीलप्लाटज हे गाव आहे. त्या गावातील लोक गेल्या 85 वर्षांपासून कपडे घालत नाहीत. या गावातील लोक सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडे आर्थिक संपन्नता आहे. मात्र, मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष सर्वजण कपडे न घालता गावामध्ये वावरतात, असं करण्यामध्ये त्यांना कसलाही संकोच वाटत नाही.
कपडे न घालण्याची परंपरा कशी सुरु झाली?
एका अहवालानुसार या गावाचा शोध इसुल्ट रिचर्डसन यांनी 1929 लावला. त्यांनी झगमगत्या जीवनापासून दूर राहून गावात जीवन व्यतीत करण्याचं ठरवल. गावामध्ये स्वीमिंग पूल, क्लब याची व्यवस्था आहे. जे पर्यटक गाव पाहायला येतात त्यांनाही कपडे न घालता गावात प्रवेश करावा लागतो.
थंडीच्या दिवसात कपडे घालण्याची मुभा
गावातील लोकांना साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात जायचं असेल तर त्यांना कपडे घालण्याची मुभा दिली जाते. मात्र, ज्यावेळी तप परत येतात त्यावेळी त्यांना कपडे न घालता गावामध्ये प्रवेश करावा लागतो. ज्यावेळी यूरोपात थंडीचे दिवस असतात त्यावेळी लोकांना कपडे घालण्याची सूट देण्यात आलेली आहे. कोणत्याही कारणासाठी एखाद्या व्यक्तीला संकटात कपडे घालण्याची इच्छा असल्यास त्यांना परवानगी देण्यात येते. लोकांना या परंपरेची सवय झाली असल्यानं त्यांना याबाबत संकोच वाटत नाही. काही सामाजिक संस्थांनी याचा विरोध केला, मात्र, नंतर तो बंद झाला.
VIDEO : Mumbai | मुंबईत लसीचा मोठा तुटवडा, दीड दिवस पुरेल इतकाच लसीचा साठाhttps://t.co/cbcKLxMvx6
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 8, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO : मध्य प्रदेशचा ‘तो’ व्हिडीओ, पोलिसांनी इतकं खवळून का मारलं?
हवेत उडी घेणाऱ्या तरुणाचा खतरनाक स्टंट; IPS अधिकारी म्हणातो सुरुवातीला अशक्य वाटतं पण नंतर…
VIDEO: ‘कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली’, तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?
Britain Village Spielplatz Where People Live Without Clothes