मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांना घाम फुटला असल्याचं लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. त्या म्हैशीने (Buffalo Attack Video) लहान उचलून फेकले आहे, त्याचबरोबर मारहाण सुध्दा केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कोणत्या ठिकाण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्हाला एक म्हैस दिसत आहे. ती कुठूनतरी पळत आलेली आहे. त्या म्हैशीला पाहून लोकं जिकडे जागा मिळेल तिकडे पळत आहेत. तिथं असलेली महिला त्या म्हैशीला पाहून घरात गेली आहे. त्यानंतर वाटेत असलेल्या एका चिमुकल्याला म्हैशीने उचलून फेकले आहे. लगेच त्याला जोराची धडक सुध्दा घातली आहे. त्यावेळी तिथल्या एका इसमाने त्या व्यक्तीला घरात घेतले आहे. त्याचवेळी दुकानात असलेल्या इसमाला म्हैशीने जोराची धडक घातली आहे. त्यानंतर तो इसम सुध्दा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिलं आहे. या व्हिडीओ इंस्टाग्रामवरती sachin.raghav.naruli नावाने शेअर करण्यात आले आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओ 40 हजार लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांनी कमेंट सुध्दा केल्या आहेत. व्हिडीओच्या खाली आलेल्या कमेंट सुध्दा वाचण्यासारख्या आहेत.