VIDEO | गवा सिंहाशी पाण्यात भिडला, दोन सिंह पळून गेले, तिसऱ्या सिंहाचा पाय गव्याच्या शिंगात अडकल्यानंतर…

| Updated on: Jun 17, 2023 | 12:40 PM

सोशल मीडियावर अनेकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडते. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. तीन सिंहांना एक गवा भारी पडला असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

VIDEO | गवा सिंहाशी पाण्यात भिडला, दोन सिंह पळून गेले, तिसऱ्या सिंहाचा पाय गव्याच्या शिंगात अडकल्यानंतर...
buffalo fight with three lion
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : जंगलात अधिक ताकद असलेला प्राणी हल्ला (Animal attack video) करतो आणि त्याच्यापेक्षा ताकदीने कमजोर असलेला प्राणी त्याच्यापासून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) झाले आहेत. ज्या प्राण्याला अधिक ताकद आहे, असे प्राणी छोट्या प्राण्यावर अधिक ताकदीनिशी हल्ला करतात. धक्कादायक गोष्ट ही आहे की, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तीन सिंह एका गव्याची शिकार करण्यासाठी (buffalo fight with three lion) पाण्यात उतरले आहेत. त्यांनतर काय झालंय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

काहीवेळाने सिंह तिथून पळ काढतो

व्हिडीओमध्ये तीन सिंह एका गव्याला पाण्यात फसवतात. त्याचवेळी आपला जीव वाचवण्यासाठी गवा कासावीस होतो. तीन सिंह एकाचवेळी गव्यावरती हल्ला करतात. परंतु गव्याचा अधिक ताकद असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यापैकी दोन सिंह माघार घेतात. त्याचबरोबर गवा सुद्धा त्यांच्यावर हल्ला करतो. एक सिंह गव्यावरती मागच्या बाजूने हल्ला करतो. त्याचवेळी काहीवेळ विश्रांती घेतल्यानंतर गवा त्या सिंहाला एका हिसड्यात फेकून देतो. ज्यावेळी सिंहाला जोराचा हिसडा दिला, त्यावेळी तो हवेत उडाला. त्यानंतर त्याचा पाय गवाच्या शिंगात अडकला आहे. त्यावेळी सिंह आपला जीव वाचवण्यासाठी पुन्हा गव्याशी भिडतो. काहीवेळाने सिंह तिथून पळ काढतो.

हे सुद्धा वाचा

लोकांना व्हिडीओ आवडला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ वाइल्ड लाइफ यांचा आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 53 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ अनेक लोकांनी लाईक सुद्धा केला आहे. व्हिडीओला विविध प्रतिक्रिया येत आहेत.