न्यूयॉर्क : अमेरीकेच्या अपोलो – 11 मोहीमेतील सहभागी झालेले अंतराळवीर आणि निल आर्मस्ट्राँग पाठोपाठ चंद्रावर दुसरे पाऊल टाकणारे डॉ. बझ आल्ड्रीन यांनी त्याच्या 93 वाढदिवसाला त्यांची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या डॉ. एन्का फॉर यांच्याशी रेशीमगाठ मारत ही गोड बातमी ट्वीटर अकाऊंटवरून जाहीर केली आहे. हे त्यांचे चौथे लग्न आहे. त्यांनी आपल्या पत्नीसोबतचे छायाचित्रही ट्वीटरवर पोस्ट केले आहे. लॉसएंजेलीस येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात अमेरीकेच्या अंतराळ मोहीमेचे लिव्हींग लीजंड डॉ. बझ आल्ड्रीन यांनी आम्ही दोनाचे चार झाल्याचे जाहीर केले.
डॉ. बझ आल्ड्रीन यांनी ट्वीटवर म्हटले की माझ्या 93 व्या वाढदिवशी मला हे जाहीर करण्यात अत्यंत आनंद वाटत आहे की माझी अनेक काळापासूनची मैत्रीण डॉ.एन्का फॉर हीच्याशी माझी लग्नगाठ बांधली गेली आहे. एखाद्या अगदी तारूण्याच्या उंबरठ्यावरच असल्यागत वाटत असल्याचे आल्ड्रीन यांनी लिहीले आहे. त्यांनी ट्वीट करून दिलेली ही बातमी 18 लाख नेटधारकांनी पाहीली. 22 हजाराहून अधिकांनी लाईक केली आहे, काही लोकांनी चंद्रावर हनीमुन करा अशीही मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.
20 जुलै 1969 रोजी निल आर्मस्ट्राँग यांच्यानंतर आल्ड्रीन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होता. निल आर्मस्ट्राँग यांचा 2014 रोजी जगाचा निरोप घेतला आहे. 16 जुलैला अपोलो -11 निल यांच्या रॉकेट चंद्राच्या दिशेनी उड्डाण केलं आणि 3 दिवसांनी ( 20 जुलैला ) आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रीन चंद्रावर उतरले. त्या रात्री सगळ्या जगाचं लक्ष चंद्राकडे लागलं होतं. रेडिओवर लाईव्ह कॉमेंटरी सुरु होती. कमांडर कॉलिन्स चंद्रा भोवती फेऱ्या मारत राहीले आणि आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन दोघे चंद्रावर उतरले आणि इतिहास घडला. ही मोहीम यशस्वी झाली.