Fact Check | Oxygen Level : कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरी तेलामुळे वाढवू शकते ऑक्सिजन पातळी? जाणून घ्या सत्य

| Updated on: Apr 19, 2021 | 7:27 PM

कोरोना टाळण्यासाठी किंवा कोरोनापासून बरे होण्यासाठी अनेक उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही उपाय करु नका. (Can camphor, clove, ajwain and eucalyptus oil increase oxygen levels, Know the truth)

Fact Check | Oxygen Level : कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरी तेलामुळे वाढवू शकते ऑक्सिजन पातळी? जाणून घ्या सत्य
कापूर, लवंग, अजवाईन आणि नीलगिरी तेलामुळे वाढवू शकते ऑक्सिजन पातळी?
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरस(Coronavirus)च्या रुग्णांची संख्या ज्या दराने वाढत आहे, त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर(Oxygen cylinder) आणि बेडची मागणीही त्याच वेगाने वाढत आहे. दरम्यान, एक सोशल मीडिया पोस्ट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात येत आहे. (Can camphor, clove, ajwain and eucalyptus oil increase oxygen levels, Know the truth)

कापूर, लवंगा, ओवा ऑक्सिजनची पातळी वाढवते?

या व्हायरल पोस्ट(Viral post)ला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही शेअर केले आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की कापूर(Camphor), लवंग(Clove), ओवा(ajwain) आणि निलगिरीचे तेला(Eucalyptus oil)चे काही थेंब सूंघल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास(Oxygen level increase) मदत होते.व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरीचे तेल मिसळून एक पुडी तयार करा आणि दिवसभर सूंघत रहा. असे केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि कंजेशनचा त्रास दूर होतो. या प्रकारची पुडकी लडाखमधील पर्यटकांना ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागल्यावरही दिली जाते. हा एक घरगुती उपाय आहे.

दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही अहवाल नाही

असे दावे सिद्ध करण्यासाठी कोणताही अहवाल नाही (No reports to prove the claim), जे सिद्ध करेल की कपूर, लवंग, ओवा आणि निलगिरी तेल रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवते आणि श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तथापि, सौम्य श्वसन संसर्गामध्ये या थेरपीमुळे तुम्हाला बरे वाटेल.

बंद नाक उघडल्याने ऑक्सिजनची पातळी वाढेल, याचा कोणताही पुरावा नाही

त्वचेवरील खाज आणि वेदना कमी करण्यासाठी कापूर चोळले जाते, परंतु कापूर बंद नाक (Nasal congestion) उघडण्यास फायदेशीर आहे असे कोणत्याही अभ्यासात सिद्ध झाले नाही. तसेच, एका अभ्यासात असेही समोर आले आहे की बंद नाक उघडल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, असे काही नाही. त्याचप्रमाणे कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरी तेल शरीराच्या ऑक्सिजन पातळी वाढविण्यात मदत करते असा दावा करु शकेल असा कोणताही अभ्यास नाही.

कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

एकंदरीत, कोरोना टाळण्यासाठी किंवा कोरोनापासून बरे होण्यासाठी काढा घेणे, स्टीम घेणे आणि आयुर्वेदिक औषधांचा अवलंब करणे यासारखे अनेक उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही उपाय करु नका. (Can camphor, clove, ajwain and eucalyptus oil increase oxygen levels, Know the truth)

इतर बातम्या

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची NIA आणि ED मार्फत चौकशी करा : अशोक चव्हाण

Maharashtra Lockdown : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय