कॅनडा | 9 डिसेंबर 2023 : सोशल मिडीयावर हल्ली प्रत्येकजण मनाला येईल तसे स्वत:चे मत मांडत असतात. अनेक मंडळी या सुविधेच्या गैरफायदा घेत असतात सर्व हद्द पार करीत असतात. यात महिलांना अनेकदा थेट टार्गेट केले जात असते. परंतू काही महिला न घाबरता बेधडकपणे या ट्रोलरच्या झुंडींना उत्तरं देत त्यांना उघडे पाडत त्यांच्या बुरघा टराटरा फाडून टाकत असतात. असाच एक प्रकार घडला आहे. एका टीव्ही न्यूज ॲंकरने आपल्याला टार्गेट करणाऱ्या ट्रोलरला चांगलाच धडा शिकविला आहे. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
अलिकडेच कॅनडाच्या एका वृत्तनिवेदिकेला बॉडी शेमिंगचे शिकार व्हावे लागले. परंतू आपल्या शरीरावरून ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला तिने लाईव्ह टीव्हीवर उघडे पाडत त्यांची पार अब्रू काढून टाकली. तिने या ट्रोलर लाईव्ह टीव्हीवर जे उत्तर दिले ते व्हायरल होत आहे. वास्तविक झाले काय की ग्लोबल न्यूज मॉर्निंग कॅलगरीवर वृत्त निवेदिका लेस्ली हॉर्टन ट्रॅफीक संबंधीची बातमी सांगत होती. या बातमीपत्राचे वाचन सुरु असतानाच तिने मध्येच आत्ताच मला एक ई-मेल आला आहे. एका प्रेक्षकाने लिहीलेय की, प्रेग्नेंसीसाठी तुम्हाला शुभेच्छा ! हॉर्टन पुढे म्हणाल्या की थॅंक्यू, परंतू मी प्रेग्नंट नाही. वास्तविक गेल्यावर्षी मला कॅन्सर झाल्याने माझे गर्भाशय गमवावे लागले होते. माझ्या वयाच्या महिला अशाच दिसतात. त्यामुळे हे तुमच्यासाठी ऑफेंसिव्ह असेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे.’
तिने आपल्या शोचा समारोप करताना म्हटले की आपण ई-मेल करण्यापूर्वी थोडासा विचार करा. वृत्तनिवेदिका लेस्ली हॉर्टन यांच्या तडाखबंद उत्तराने सोशल मिडीयावर त्यांचे कौतूक केले जात आहे. अनेक लोकांना बॉडी शेमिंगच्या विरोधात उभे रहाण्याबद्दल आणि आपल्या स्वाभिमान जागृतल राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
I love this woman. Leslie Horton responds to a troll sharing their opinion on her. 💜 pic.twitter.com/v0DHuVIS1e
— Nicky Clark (@MrsNickyClark) December 7, 2023
लेस्ली हॉर्टन यांच्या या व्हिडीओवर कॅनेडीयन कॅन्सर सोसायटीने लिहीलंय की , तुम्ही एक कॅन्सर वॉरीयर आहात, आणि प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहात. तुम्ही जे करीत आहात ते करत राहा. तर अन्य एका युजरने म्हटले की, ‘ कॅन्सर असो वा नसो, लेस्ली माझ्या मते तुम्ही चांगल्या दिसता. जर कोणी पॉझिटिव्ह बोलत नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला ! ‘
सोशल मिडीया आणि डिजिटल मिडीयाच्या जमान्यात लोकांना ऑन स्क्रीन बॉडी शेमिंगमध्ये वाढ झाली आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, एथलीट आणि ऑनलाईन कटेंटमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींना नेहमीच बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यासह सेल्फ रिस्पेक्टवर देखील परिमाण होऊ शकतो.