मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज आपल्याला व्हायरल व्हिडीओ (Viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये काही विनोदी, इमोशनल, थरार, अपघात या पध्दतीचे व्हिडीओ असतात. सध्या सोशल मीडियावर इमोशनल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ एका सलूनमधील आहे. सलून एक तरुणी आपले केस कापत असताना रडत असल्याचे व्हिडीओत (Cancer Patient Hair Cutting) दिसत आहे. लोकांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर महिलेला सल्ला सुध्दा दिला आहे.
कॅन्सर झालेली एक महिला आपले केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये गेली आहे. तिथं असलेला न्हावी त्या महिलेचे केस एका बाजूने कापतं आहे. ज्यावेळी त्या महिलेचे अर्धे केस कापून होतात. त्यावेळी मास्क घातलेली महिला रडायला सुरुवात करते. त्यावेळी केस कापत असलेला न्हावी त्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु तरी सुध्दा ती महिला रडत असल्याचं व्हिडीओ पाहायला मिळत आहे. त्यावेळी केस कापणारा तरुण सुध्दा अधिक इमोशनल झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
ज्यावेळी सलूनमध्ये महिलेचे केस एका हातामध्ये तरुणाने पकडले, त्यानंतर तरुणाने एका हातामध्ये असलेले स्ट्रीमर सुरु केले. त्यानंतर केसं पाहून महिलेच्या डोळ्यात पाणी आले. परंतु संपुर्ण केस कापून झाल्यानंतर महिला अधिक सुंदर दिसत असल्याचे सोशल मीडियावर अनेकांनी सांगितले आहे.
हा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर करण्यात आला आहे, त्याचबरोबर 21 सेंकदाचा व्हिडीओ असून 90 लाख लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर महिलेला काहीचं होणार औषध व्यवस्थित घेण्याचं सल्ला लोकांनी दिला आहे.