मुंबई : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढतोय. अश्यात अंगाची लाहीलीही होत आहे. उन्हामुळे अनेकांना त्रास होतोय. प्राण्यांनाही या उन्हाचा त्रास होतोय. अश्यातच एक व्हीडिओ समोर आला आहे. यात एक मांजर शॉवरखाली अंघोळ करताना दिसत आहे. व्हीडिओमधली ही मांजर (Cat Viral video) शॉवरचं पाणी पितानाही दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये तुम्ही मांजर बाथरूममध्ये उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. बाथरूमचा शॉवर कसा चालतो, पाणी कसलं आहे याच्याशी तिला काही देणंघेणं नाही. शॉवर चालू होता तेव्हा मांजर तिथे गेली त्या पाण्यात भिजायला लागली. मांजरीला तहानही लागली होती. मग तिने शॉवरमधून येणारं पाणी पिण्यास सुरुवात केली. पाण्यात भिजत असताना ती मध्येच डोळे बंद करते आणि पाणी पिऊ लागते. मांजर पाणी पीत असताना वापरला गेलेला आवाजही खूपच खास आहे. त्यामुळे व्हीडिओला चार चांद लागलेत. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हीडिओ Instagram च्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत मांजरीचं कौतुक केलंय. यावर 22 हजार जणांनी कमेंट केली आहे.
काही दिवसांआधी माकडाचा असाच एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या गावातील हा व्हीडिओ आहे. या गावात माकडांची संख्या मोठी आहे. माकडांच्या वास्तव्याबाबत या गावात जुनी परंपरा आहे.. सध्या उन्हाचा कडाका असल्यानं सर्वचजण पोहण्याची मजा घेताना दिसतात.. अशात माकडेही मागे राहिलेली नाहीत.. शिर्सुफळ येथील एका घराबाहेरील टाकीत माकडांनी डुबक्या मारत उन्हाळ्यात पाण्याचा आनंद घेतला.
शिर्सुफळमध्ये माकडांच्या पाण्यात डुबक्या! pic.twitter.com/jFMT85HSp0
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2022