Chanakya Niti : आपल्या जोडीदाराला लग्नापूर्वी आवश्य विचारा या 3 गोष्टी, आयुष्यात घटस्फोटच काय साधं भांडण सुद्धा होणार नाही

| Updated on: Nov 10, 2024 | 7:14 PM

चाणक्य यांनी विवाहाबाबत आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये तुमचा जोडीदार कसा असावा? जोडीदार कसा नसावा? आदर्श जोडीदारामध्ये कोणते गुण असतात अशा अनेक गोष्टी आहेत.

Chanakya Niti : आपल्या जोडीदाराला लग्नापूर्वी आवश्य विचारा या 3 गोष्टी, आयुष्यात घटस्फोटच काय साधं भांडण सुद्धा होणार नाही
Follow us on

आर्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते, त्यांनी आपले विचार चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मांडले आहेत. आर्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार आजही मनुष्याला जीवन जगताना अनेक ठिकाणी मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी विवाहाबाबत आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये तुमचा जोडीदार कसा असावा? जोडीदार कसा नसावा? आदर्श जोडीदारामध्ये कोणते गुण असतात, पत्नीमध्ये कोणते गुण असावेत, पतीमध्ये कोणते गुण असावेत, पत्नीचं कर्तव्य काय आहे? पतीचं कर्तव्य काय आहे? जोडदारासोबत भांडण का होतात? अशा एकना अनेक गोष्टी आणि त्यावरील उपाय आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत.दरम्यान चाणक्य यांनी लग्नापूर्वी जोडीदाराकडून काही गोष्टी जाणून घेण्यास सांगितल्या आहेत, त्यामुळे तुमचं वैवाहिक आयुष्य सुखात जाऊ शकतं असं चाणक्य सांगतात, लग्नापूर्वी जोडीदाराकडून जाणून घ्यावयाच्या गोष्टीबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

जोडीदाराला त्याच योग्य वय विचारा

चाणक्य नीतीनुसार लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याचं वय विचारलंच पाहिजे, कारण अनेकदा पती-पत्नीमध्ये असलेलं वयाचं अंतर त्यांचं लग्न तुटण्याचं किंवा घटस्फोटाचं प्रमुख कारण असतं. जर दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद असेल तर असं लग्न फार काळ टीकत नाही. त्यामुळे लग्न करताना पती आणि पत्नीमध्ये जास्त वय नसावं असं चाणक्य म्हणतात.

आरोग्याबाबत माहिती

आर्य चाणक्य सांगतात लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. लग्नापूर्वी हे स्पष्ट होणं आवश्यक आहे की तिला किंवा त्याला एखादा आजार आहे का? कारण लग्नानंतर ही गोष्ट समोर आल्यास दोघांनाही त्याचा त्रास होऊ शकतो.

जुने प्रेमसंबंध

आर्य चाणक्य म्हणतात लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या पती किंवा पत्नीला त्याच्या जुन्या प्रेमसंबंधांबाबत आवश्य विचारणा करावी. कारण कोणंतही नांत हे विश्वासावर कायम असतं. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या जोडीदाराला बाहेरून आपल्या प्रेमसंबंधांबाबत माहिती मिळाली तर तुम्हाला अडचणीचा सामाना करावा लागू शकतो.