माणूस कधी शिकणार? वाघाच्या बछड्याच्या ‘त्या’ कृतीची सोशल मीडियावर चर्चा

| Updated on: Feb 15, 2024 | 3:02 PM

Tadoba National Park Tiger Plastic Bottle Video Viral : कधी कधी प्राण्याची एखादी कृती मानवाला बरंच काही शिकवून जाते... जंगलातील प्राणी आपल्याला कृतीतून माणसाला संदेश देतो... ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हीडिओत नेमकं काय? पाहा...

1 / 5
चंद्रपूर | 15 फेब्रुवारी 2024 : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माणूस कधी शिकणार? हाच एक सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.

2 / 5
सोशल मीडियावर एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वाघाचा एक बछडा तलावाजवळ जातो. पाण्यात असणारी प्लास्टिकची बाटली तोंडात धरून उचलतो आणि चालू लागतो.

3 / 5
अवघ्या 23 सेकंदाचा हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेतोय. या व्हीडिओतून वाघोबा न कळतपणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतोय.

4 / 5
हा व्हीडिओ आहे चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या नयनतारा वाघाचा.... मानवाने केलेला कचरा हा वाघ उचलतो.

5 / 5
पर्यावरण संवर्धन किती गरजेचं आहे. यावर अनेकदा बोललं जातं. मात्र हा वाघ न कळतपणे पर्यावरण वाचवण्याचा संदेश देतोय. नेटकऱ्यांनी हा व्हीडिओ शेअर करत या मुक्या प्राण्यांना कळतं आपल्याला कधी कळणार? असा सवाल केला जातोय.