Video : उन्हाच्या झळा सोसवेनात, पण या बायकांनी घातलाय वेगळाच घाट, चक्क गाडीवर बनवल्या चपात्या!

| Updated on: May 01, 2022 | 4:01 PM

व्हीडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी कमेंट करत ऊन वाढल्याचं म्हटलंय. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Video : उन्हाच्या झळा सोसवेनात, पण या बायकांनी घातलाय वेगळाच घाट, चक्क गाडीवर बनवल्या चपात्या!
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : सध्या उन्हाचा (Summer) तडाखा खूपच खूपच वाढला आहे. अश्याच अंगाची लाहीलही होतेय. घराबाहेर पडणंही कठीण झालंय. अश्या तळपत्या उन्हातही कोण काय करेल याचा नियम नाही… उन्हा आपण बायका कुरडई, पापड करताना पाहिलं असेल. पण उन्हात चपात्या कराताना कधी कुणाला पाहिलंय का? नसेल पाहिलं तर जरा थांबा आज अश्याच एका कामाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे. यात दोन महिला उन्हात उभं राहून चपाती करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

उन्हा आपण बायका कुरडई, पापड करताना पाहिलं असेल. पण उन्हात चपात्या कराताना कधी कुणाला पाहिलंय का? नसेल पाहिलं तर जरा थांबा आज अश्याच एका कामाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन महिला उन्हात उभं राहून चपाती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला उन्हात उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर चपाती भाजताना दिसत आहे. व्हीडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण शेवची पाहाल तर चपाती भाजलेली दिसते.

व्हीडिओमध्ये दोन महिला चपाती करताना दिसत आहेत. आधी त्या चपाती लाटतात तर नंतर कारच्या पुढच्या भागावर भाजतात. हा व्हीडिओ ओडिशातील सोनपूर इथला आहे. nilamadhabpanda नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. याला सोनपूरमधला व्हीडिओ, कारवर चपाती भाजता येते, असं याला कॅप्शन देण्यात आलं आहे.

व्हीडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी कमेंट करत ऊन वाढल्याचं म्हटलंय. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.