मुंबई : एखाद्याचा मूड खराब असेलतर ती व्यक्ती लहान मुलांचे आणि जनावरांचे व्हिडीओ (Animal Video) पाहत असते. कारण त्यामुळे आपला मूड चेंज होत असतो. मुलांचे काही व्हिडीओ असे असतात की, काही लोकं पटकन फ्रेश होतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ (Trending Video) पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे लोकं लहान मुलांचे व्हिडीओ तयार करतात. नुकताचं एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चिमुकला आपल्या आईला ऑफिसला जाण्यासाठी कशा पद्धतीने आधार देत आहे हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दिसत आहे. तो आपल्या आईसोबत दिसत आहे. आई पुन्हा-पुन्हा ऑफिसला जाण्यास नकार देत आहे. त्याचवेळी मुलगा आपल्या आईला ऑफिसला जाण्यासाठी प्रेरित करीत आहे. हा व्हिडीओ इतका चांगला आहे की, तुम्हाला तुमच्या लहानपणीचं सुध्दा आठवण येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले की एक छोटा मुलगा आपल्या आईला कशा पद्धतीने समजवत आहे. आई प्रत्येक दिवशी ऑफिसला जाण्यासाठी परेशान दिसत आहे. सारखी म्हणत आहे की, मला ऑफिसला नाही जायचं. त्यावर छोटा मुलगा म्हणतो, शांत बस शांत…ऑफिसला तर जावचं लागतं. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. युवराज भारद्वाज यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 मिलियन लोकांनी पाहिला आहे.