Fishing Jugaad : सोशल मीडियावर (Social media) तुम्ही देसी जुगाडचे अनेक व्हिडिओ (Videos) पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहोत. त्याला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे देखील एका लहान मुलाने मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे जुगाड केले ते पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. यानंतर त्यांनी व्हिडिओ ट्विट करून मुलाचे कौतुक केले आहे. महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुलाच्या हा आश्चर्यकारक जुगाडाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट लिहिली आहे. व्हिडिओमध्ये मूल देसी जुगाड लावून मासे पकडताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे, की कोणत्याही डिटेल्सशिवाय हा व्हिडिओ त्यांच्या इनबॉक्समध्ये सापडला आहे. आनंद महिंद्रा पुढे म्हणाले, की अशा व्हिडिओमुळे या गोंधळलेल्या जगात खूप शांततेची भावना येते. त्यांनी लिहिले, ‘निश्चय+साधेपणा+संयम = यश’
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की मूल एक लाकडी ढाचा आणते. नदीच्या काठावर त्याने ती गाडली. यानंतर, तो पिठाचा गोळा त्याला जोडलेल्या स्ट्रिंगमध्ये अडकवतो. त्यानंतर तो पाण्यात टाकतो. मूल काही क्षण बसले आहे. त्याला थोड्या वेळाने जाणवले, की त्याच्या गळाला मासे अडकले आहेत. यानंतर तो लाकडावर बसवलेले चाक फिरवू लागतो आणि तार ओढतो. दोन मोठे मासे दोरीत अडकल्याचे त्यात दिसेल. आता हा व्हिडिओ पाहा…
This showed up in my inbox without commentary. It is strangely calming to watch in an increasingly complex world. A ‘short story’ that proves: Determination + Ingenuity + Patience = Success pic.twitter.com/fuIcrMUOIN
— anand mahindra (@anandmahindra) April 1, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी, सुमारे 70 हजार लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे. बहुतेक यूझर्स मुलाच्या देसी जुगाडचे कौतुक करत आहेत. आनंद महिंद्रा लोकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. हा व्हिडिओ कुठला आहे, हे कळू शकलेले नाही, मात्र मुलाकडे बघून तो भारतीय असल्याचे समजते. याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.