बेंगलोर : सध्या मोबाईलवरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Video) झाल्यापासून त्यावर अनेक कमेंट येऊ लागल्या आहेत. बेंगलोरमधील (Bengaluru) लोकांना हा व्हिडीओ एकदम अधिक आवडला आहे. शहरात राहणाऱ्या लोकांना व्हिडीओत दिसणाऱ्या त्या मुलाचं अधिक कौतुक वाटलं आहे. आयुषी कचरु नावाच्या मुलींनं हा सगळा प्रकार ट्विटरवरती (Twitter) शेअर केला आहे. त्यानंतर लोकांच्या कमेंटचा महापूर आला आहे.
ट्विटमध्ये घरी बसून कंटाळलेली मुलं, फास्ट पैसे कमवण्यासाठी लिंबू पाण्याचा स्टॉल लावला आहे आणि ते लिंबूपाणी विकत आहेत. विशेष म्हणजे ही स्टोरी इथेचं थांबत नाही. लिंबूपाणी विकत असताना मुलांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वेगळी केली आहे. ट्विटरवरती पोस्ट केलेल्या फोटोतून तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल. त्या मुलाने एक मेन्यूकार्ड तयार केले आहे. तुम्ही एखादा माल खरेदी केल्यानंतर त्यावर तुम्हाला पाच रुपयांपर्यंतची सवलत देण्यात आली आहे.
आयुषी कचरु यांनी त्या ट्विटमध्ये “माझ्या दिवसाची खास गोष्ट म्हणजे इंदिरानगरच्या रस्त्यावर या मुलांना कंटाळा आल्याने लिंबूपाणी विकताना पाहणे. विक्रीची कला शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग आणि वय. आवडलं.” हा व्हिडीओ बेंगलोरमधील असून नेटकवरती अधिक व्हायरल झाला आहे. क्रिप्टोकरन्सी स्वीकारणाऱ्या चायवालांपासून ते यूट्यूब चॅनेलसह ऑटोवाल्यांपर्यंत, शहर अनोख्या लोकांनी भरलेले आहे. आणि शहरात राहणाऱ्या मुलांनीही ही संस्कृती पाळायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
The highlight of my day was coming across these dumdums on the streets of Indiranagar who were selling lemon water because they were broke and bored. Best way and age to learn the art of selling. Love it. @peakbengaluru @NammaBengaluroo pic.twitter.com/Rs1swiFaOh
— Aayushi Kuchroo (@KuchrooAayushi) March 31, 2023
सोशल मीडियावर लहान मुलांचे चांगले व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यापैकी हा एक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर कमेंट सुध्दा केली आहे.