Child rescue video : एका चिमुरडीचा बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये मुलगी खेळत असताना मेट्रो स्टेशनच्या (Metro) ग्रीलवर गेली. मात्र तिथं ती अडकली आणि जोरजोरात रडू लागली. त्याचवेळी मुलीचा आवाज ऐकून एक सीआयएसएफ जवान तिला वाचवण्यासाठी लगेच ग्रीलवर चढला. मुलीच्या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएस अधिकाऱ्यानेही ही क्लिप शेअर केली आहे. त्यांनी जवानाचे कौतुक करताना लिहिले आहे हिरो… त्याचवेळी सोशल मीडियावरचे यूझर्सही जवानाचे कौतुक करत आहे. ही घटना दिल्लीतील निर्माण विहार मेट्रो स्टेशनची आहे. जिथे एक मुलगी खेळता खेळता इमारतीच्या रेलिंगवर पोहोचते. मात्र, एवढ्या छोट्या ठिकाणी मुलगी कशी पोहोचली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सीआयएसएफ जवानालाही मुलगी ज्या ठिकाणी अडकली आहे तिथून तिला बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. या मुलीचे कुटुंब या मेट्रो स्टेशनखाली राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. सीआयएसएफला ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची माहिती मिळताच त्यांचा एक जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी आपली हुशारी दाखवत मुलीला सुखरूप बाहेर काढले. जवान चिमुरडीला वाचवत असताना तिथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला, जो सध्या व्हायरल होत आहे.
चिमुकलीच्या बचावाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जात आहे. हे IAS अवनीश शरण यांनीदेखील हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 1 मिनिट 15 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सीआयएसएफ जवान अत्यंत काळजीपूर्वक ही मुलगी ज्या ठिकाणी अडकली आहे, त्या ठिकाणी पोहोचतो. मात्र, सुदैवाने त्याने मुलीला कोणताही त्रास न होऊ देता तिथून सुखरूप बाहेर काढले. हे पाहून लोक या तरुणाचे खूप कौतुक करत आहेत.
Hero.? pic.twitter.com/lslo7orsFv
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 28, 2022