Crocodile shocking video : सिंहाला जसं जंगलाचा राजा म्हटलं जातं, तसंच मगरींनाही ‘पाण्याचा राजा’ म्हटलं जातं. शिकारीच्या बाबतीत त्या सिंहांपेक्षा अजिबात कमी नाहीत. ते आपल्या भक्ष्यावर अशा रितीने वार करतात, की त्यांच्या तावडीतून सुटणे कठीण असते. मगरी पाण्यात असतील तर काही वेळा ते सिंहांना आपला शिकार बनवतात. कोणत्याही शिकारीला त्यांच्या तीक्ष्ण दातांमधून सुटणे फार कठीण असते. याशिवाय, त्या इतक्या मोठ्या असतात, की त्यांचे शिकार लहान असल्यास त्या थेट गिळतात. मगरीच्या शिकारीचा एक धक्कादायक (Shocking) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये मगरीने एका छोट्या कासवाची शिकार केली आहे आणि ती त्याला खाण्याचा आणि गिळण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ती त्यात अपयशी ठरते. कारण कासवाच्या पाठीवरील दगडासारखे कवच कासवाला मगरीच्या तीक्ष्ण दातांपासून वाचवते.
मदर खूप प्रयत्न करते, पण जेव्हा तिला वाटतं की ती कासवाला इजा करू शकत नाही, तेव्हा ती त्याला सोडून देतो. मगरीच्या तावडीतून सुटल्यानंतर कासवही हळू चालते आणि तिथून निघून जाते. शिकारीच्या बाबतीत मगरीला असे अपयशी ठरलेले तुम्ही क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे, हे पाहून तुम्हालाही आधी वाटेल की मगर त्या कासवाला खाऊन टाकेल, पण शेवटी गडबड होते, ज्याची अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर scienceturkiyeofficial नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 54 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की ‘ईश्वरविहीन मगरमच्छ विश्वास करने वाले कछुए को हरा नहीं सका’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की अखेर कासवाची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.