अमेरिकन स्पेस एजन्सी नासा(NASA)ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर GIF स्वरूपात एक व्हिडिओ (Video) जारी केला आहे. हा व्हिडिओ 12 जानेवारीचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. हा महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल, असा इशारा नासाने दिला होता. जो भारतीय वेळेनुसार 19 जानेवारीला पहाटे 2:45च्या सुमारास म्हणजेच आज रात्री पृथ्वीजवळून गेला.
बुर्ज खलिफापेक्षा मोठा
नासाच्या फार नियर अर्थ स्टडीज सेंटरने ही माहिती दिली. त्यानुसार 7482 (1994 PC1) नावाचा हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने खूप वेगाने आला. या लघुग्रहाचा आकार 3,450 फूट इतका होता. म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफापेक्षा तो 700 फूट मोठा होता.
45,000 मैल वेगाने आला
नासाच्या म्हणण्यानुसार, हा लघुग्रह ताशी 45,000 मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने आला. तथापि, हा लघुग्रह पृथ्वीपासून 1.93 दशलक्ष किमी अंतरावरून गेला, जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या पाचपट जास्त आहे. मात्र तरीही त्यापासून दूर राहा, असे सांगण्यात आले. त्याचा मागोवा घेण्यासाठी नासाने तयार केलेल्या यंत्रणेच्या मदतीने ते थेट पाहण्यात आले. व्हिडिओ पाहा –
Near-Earth #asteroid 1994 PC1 (~1 km wide) is very well known and has been studied for decades by our #PlanetaryDefense experts. Rest assured, 1994 PC1 will safely fly past our planet 1.2 million miles away next Tues., Jan. 18.
Track it yourself here: https://t.co/JMAPWiirZh pic.twitter.com/35pgUb1anq
— NASA Asteroid Watch (@AsteroidWatch) January 12, 2022
याआधीही आदळलेत लघुग्रह
या महिन्यात पृथ्वीजवळून 5 लघुग्रह जाण्याची शक्यता नासाने वर्तवली आहे. जेव्हा एखादा छोटा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा तो आपोआप जळून राख होतो. तथापि, अनेक वेळा मोठे लघुग्रह ग्रहांशी आदळतात. याआधीही काही लघुग्रह पृथ्वीवर आदळले आहेत. 2019मध्ये एक लघुग्रह पृथ्वीच्या 43 हजार मैल अंतरावरून म्हणजेच अगदी जवळून गेला होता. त्याची माहिती शास्त्रज्ञांना 24 तासांपूर्वीच होती.