Crocodile Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धोकादायक मगरीला व्हॅनमधून नेले जात आहे. यादरम्यान तो कारच्या खिडकीचा काच फोडून पळून लोकांमध्ये पोहोचला. यानंतर ज्याने ज्याने ही मगर पाहिली त्यांची पळापळ झाली. अमेरिकेतील(America) फ्लोरिडा (Florida) येथील ही घटना आहे. व्हॅनमधून मगरीला प्राणीसंग्रहालयाच्या दुसऱ्या भागात हलवण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान तिने व्हॅनची (Van) खिडकी तोडून रस्त्यावर उडी मारली आणि इकडे तिकडे पळू लागली. यानंतर मगरीला घेऊन जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जेसिका स्टारने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना अतिशय धक्कादायक असा आहे. चुकून मगर वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यातून सुटली असली आणि रहिवासी असलेल्य भागात घुसली असती तर काय झाले असते, याची कल्पनाही करू शकत नाही.
सेंट ऑगस्टीन अॅलिगेटर फार्म झूलॉजिकल पार्कने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही कार्सिन मॅकक्रेडी आणि जनरल अँडरसन नावाचे कर्मचारी मगरी पकडताना पाहू शकता. धोकादायक मगरीला पकडण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली. व्हिडिओमध्ये तुम्ही कर्मचारी मगरीला पकडण्यासाठी धावपळ करताना पाहू शकता. यानंतर मगरीला जाड दोरीने पकडण्यात आले.
सध्या मगरीला पकडून नवीन ठिकाणी सुखरूप नेण्यात आले आहे. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले, की आमच्याकडे अशा घटनांसाठी व्यापक प्रशिक्षण आहे. आम्ही त्याचा सराव करतो. आम्ही मगरींना प्राणीसंग्रहालयाच्या दुसऱ्या भागात हलवत होतो. तिला प्राणिसंग्रहालयाच्या व्हॅनमध्ये ठेवण्यात आले होते. या मगरीने व्हॅनची मागील खिडकी तोडली आणि रस्त्यावर रेंगाळू लागला. मगरीला पुन्हा पकडण्यासाठी आणि नवीन अधिवासात सुरक्षितपणे आणण्यासाठी आमच्या टीमने त्वरेने काम केले.