मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाल्याचे पाहायला मिळतात. ते व्हिडीओ एका झटक्यात व्हायरल होतात असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. सध्या एका धबधब्याखाली मजा करण्यासाठी गेलेल्या लोकांचा एक व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याला कमेंट सुध्दा आल्या आहेत. हा व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. तिथं मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे पर्यटन ठिकाणी चांगलीचं गर्दी पाहायला मिळत आहे. उत्तराखंड (Uttarakhand News) राज्यातील चमोली पोलिसांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. पावसाळ्यात पर्यटन ठिकाणी गेल्यानंतर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
उत्तराखंड राज्यात मागच्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक घरं खाली पडली आहेत. काही रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चमोली पोलिसांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. पावसाळ्यात धबधब्यापासून लांब रहा असं पोलिसांनी लोकांना आवाहन करण्यासाठी व्हिडीओ शेअर केला आहे.
त्या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे तिथं अनेक पर्यटक मजा घेत आहे. धबधब्याखाली अंघोळ करीत आहेत. त्यावेळी तिथं एक ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर येऊन पडला आहे. त्यावेळी जी व्यक्ती व्हिडीओ काढत आहे. ती सुध्दा घाबरली आहे. ज्यावेळी ढिगारा अंगावर पडतो, त्याचवेळी तो व्हिडीओ सुध्दा संपतो.
बरसात के मौसम के दौरान पहाड़ो में झरनों के नीचे नहाने से बचें। pic.twitter.com/bY9Xs08zxw
— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) August 20, 2023
सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील आहे, चमोली पोलिसांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. पावसाळ्यात धबधब्याखाली अंगोळ करु नका असं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. चमोली जिल्ह्यातील बदरीनाथ राष्ट्रीय राजमार्ग दरडी कोसळल्यामुळं अनेकदा बंद झाला आहे.