दिल्ली : देशातल्या काही महत्त्वाच्या शहरात गाड्यांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत (Delhi Viral Video) वर्दळ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला (ganeshotsav 2023) सुरुवात झाल्यानंतर सगळीकडं गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते, हे चित्र प्रत्येक वर्षीचं आहे. सध्या दिल्लीत (delhi autorickshaw stunt video) जी-२० परिषदेची तयारी पुर्ण झाली आहे. तिथं येणाऱ्या परदेशी नागरिकांना आपल्याकडून खास सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीत मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अधिक वाहतूक कोंडी झाल्यामुळे रिक्षा चालकाने तिथल्या एका पायी चालणाऱ्या पूलावरुन रिक्षा नेली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा ठरला आहे.
हा व्हिडीओ देशाची राजधानी दिल्लीतील हमदर्द नगर रेड लाइट संगम विहार येथील असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. रस्त्यावर अधिक वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्या रिक्षा चालकाने फुटओवर पूलावरुन त्याची गाडी नेली आहे. हा व्हिडीओ ज्या लोकांनी पाहिला आहे, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ‘तूच खरा भारी ड्रायव्हर’असं देखील व्हिडीओच्या कमेंटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
त्या व्हिडीओत सगळीकडं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक रिक्षा चालक अचानक तिथल्या लोकांना चालण्यासाठी असलेल्या पूलावर रिक्षा चढवत आहे. त्यावेळी त्या ब्रिजवर लोकं नसल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याची रिक्षा तिथून व्यवस्थित बाहेर गेली आहे. रिक्षा चालकाचा हा स्टंट अनेकांना आवडलेला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटलं ? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.