वडापाव आवडत नाही असा क्वचितच कुणी असेल… महाराष्ट्रात राहणाऱ्यांना वडापाव प्रचंड आवडतो. मुंबईचा वडापाव प्रसिद्ध आहे. राजधानी दिल्लीत सगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ मिळतात. वडापाव मात्र महाराष्ट्रासारखा विशेषत: मुंबईसारखा मिळत नाही. मात्र दिल्ली राहणाऱ्या वडापाव प्रेमींसाठी ही बातमी… दिल्लीत मुंबई स्टाईल वडापाव विकणाऱ्या तरूणीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तिचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. या तरूणीकडे वडापाव खाण्यासाठी खाद्यप्रेमी रांगा लावतात. दिल्लीत माझ्यासारखा वडापाव कुणीच देत नाही. मी प्युअर मुंबई स्टाईल वडापाव देते, असा दावा ही तरूणी करते…
ही आहे चंद्रिका गेरा दीक्षित… चंद्रिका ही ‘वडापाव गर्ल’ नावाने दिल्लीत प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर वडापाव विकणारी तरूणी सध्या देशभरात प्रसिद्ध झाली आहे. चंद्रिकाचा लहान मुलगा आजारी पडला. तेव्हा तिने नोकरी सोडून वडापाव विकण्यातचा व्यवसाय सुरु केला. सध्या ती दिल्लीतील प्रसिद्ध ‘वडापाव गर्ल’ आहे. चंद्रिकाच्या वडापावची टेस्टही चांगली आहे. त्यामुळे लोक तिचा वडापाव खायला येतात.
मी सेम टू सेम मुंबईच्या पद्धतीने वडापाव बनवते. वडाही तसाच आहे. चटणी देखील मुंबईसारखीच आहे. शिवाय वडापावसाठी लागणारा पावही मी बेकरीतून विशेष पद्धतीने बनवून घेते. माझा वडापाव प्रचंड टेस्टी आहे. इतका चविष्ट वडापाव तुम्हाला पूर्ण दिल्लीत कुठेच खायला मिळणार नाही, असा दावा चंद्रिका करते. 50 रुपयांना चंद्रिका वडापाव विकते.
चंद्रिका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिथे ती तिच्या कामाचे व्हीडिओ शेअर करते. शिवाय तिचं यूट्यूब चॅनेलही आहे. यावर नेटकरी तिच्या व्हिडिओला पसंती देतात. सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे तिच्याकडे वडापाव खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्यादेखील वाढली आहे.
प्रसिद्धी यूट्यूबरही तिच्या कामाची दखल घेतात. तिच्या वडापावच्या व्यवसायाबाबत व्लॉग बनवतात. यामुळे चंद्रिकाच्या कमाईत वाढ झाली आहे. शिवाय सोशल मीडिया स्टार्स आणि इन्फ्लुएंसरही तिच्यासोबत व्हीडिओ बनवतात. यामुळे चंद्रिकाच्या व्यावसायात मोठी वाढ झाली आहे.