नवी दिल्ली : दिल्ली पोलिस (Delhi Police) कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या पोलिस कर्मचाऱ्याने चांगल्या आवाजात गाणं गायलं आहे, म्हणून पोलिस कर्मचाऱ्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा आवडेला असा तो व्हिडीओ आहे. दिल्लीतील एक पोलिस कर्मचारी आहे. तो एका पार्किंगच्या जागेत चांगल्या आवाजात गाणं म्हणत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या (Social media) विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.
तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, परंतु आपली आवड लोकांनी जोपासायला हवी. दिल्लीतील पोलिस कर्मचारी लोकांच्या सुरक्षेसाठी काम करीत आहे. परंतु त्या कर्मचाऱ्याकडे असलेलं गायनाचं स्कील त्याने जागृत ठेवलं आहे. कर्मचाऱ्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ‘दिल संभल जा जरा’ हे गाणं त्या पोलिस कर्मचाऱ्यानं गायलं आहे. एका पार्किंगच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी सुरेल आवाजात गाण गात आहे. पोलिस कर्मचारी वर्दीत असल्यामुळे अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर musicalchamber या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि लाईक सुध्दा केलं आहे. आतापर्यंत तो व्हिडीओ दोन लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोकं त्यावर चांगल्या कमेंट करीत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुमची लपलेली प्रतिभा अप्रतिम आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘सुपर.’