दिल्ली : सोशल मीडियावर लोकांना नेहमी चांगले आणि वाईट असे दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ (trending news in marathi) पाहायला मिळतात. लोकांना जे व्हिडीओ (viral video) आवडतात असे व्हिडीओ अधिक व्हायरल होतात. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हिडीओ पाहायला मिळतात. काही मजेशीर व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात. त्यामुळे लोकं मजेशीर व्हिडीओ शोधत असतात. सध्या अशाचं पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती सायकलवरती स्टंट (cycle stunt video) करीत आहे. काहीवेळाने त्या व्यक्तीचा बॅलेन्स गेला आहे. त्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
सध्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती सायकलवरती स्टंट करीत आहे. त्यानंतर पुढे काय झालंय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला सु्ध्दा हसू आवरणार नाही. त्या व्हिडीओ त्या व्यक्तीने कशा पद्धतीने सायकला स्टंट केला आहे, हे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याने पाय सुध्दा सायकलच्या हँन्डलवरती ठेवला आहे. काहीवेळाने त्या व्यक्तीचा सायकलवरील बॅलेन्स बिघडतो. त्यानंतर तो पाठीवर पडला आहे. उठल्यानंतर तो कंबरेवरती हात ठेवून चालत आहेत. त्या व्हिडीओला ‘टूटा एक परिंदा’ हे गाणं लावलं आहे.
दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ त्या अधिकृत खात्यावरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, स्टंट करणार तर अशीचं अवस्था होणार, रस्त्यावर सुरक्षित राहा. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वी शेअर केला आहे. या व्हिडीओला लोकं विविध कमेंट करीत आहेत. एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, स्टंट केल्या असंचं होणार. याच्या आगोदर दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.