चेन्नई : वाढते प्रदूषण पाहता पर्यावरण संवर्धनासाठी अनेक शक्कल लढवत असतात. चेन्नईच्या(Chennai) चहावाल्याने( tea shop owner) अशीच एक भन्नाट आयडिया लढवली आहे. हा चहावाला ग्राहकांना नारळाच्या करवंटीत चहा देत आहे.
अनेक चहा विक्रेते पेपर कपचा वापर करतात. तर कुल्लड चहा देखील सर्वांनाच माहित आहे. तर चहा प्या आणि कप खावून टाका असा ट्रेंडही आला आहे. या पर्यावरण पूरक कल्पनांमध्ये आता नारळाच्या करवंटीची भर पडली आहे. चेन्नईत नारळाच्या करवंटीत चहा पिण्याचा अनुभव चहा प्रेमींना घेता येणार आहे.
प्रत्येच छोटा मोठा व्यावसाईक आपला बिजनेस युनीक बनवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतो. अशीच एक हटके संकल्पना चेन्नईतील चहा विक्रेता राबवत आहे. दिनकरन असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. मरिना बीचवर त्याचा चहाचा स्टॉल आहे.
दिनकरन हा स्टॉलवर चहा पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना नारळाच्या करवंटीमध्ये चहा देत आहे. काहीतरी वेगळे करण्याची इच्छा दिनकरन यांची इच्छा होती.
काचेचा कप किंवा कागदी कप यांच्यापेक्षा करवंटीचे कप ऑर्गेनिक आहेत. या कपामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. सहज विघटन होणारा हा कचरा आहे. त्यामुळे या कपाचा पर्याय आपण निवडला असल्याचे दिनकरन यांनी सांगितले.
‘शौक बडी चीज है’ म्हणतात, असाच एक महागडा…शौक सध्या ट्रेंड करतं आहे. चहा पिणाऱ्या शौकिनांसाठी (Tea Lover) एक आनंदाची बातमी आहे. आता ते 24 कॅरेट सोन्यापासून (24 Carat Gold) बनवलेला चहा पिऊ शकतात. त्यासाठी त्यांना थोडा खिसा मात्र हलका करावा लागेल. आसाममधील व्यापारी (Assam entrepreneur) रणजित बरुआ यांनी 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेला चहा बाजारात आणला आहे. त्याची किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 2.5 लाख रुपये प्रति किलो आहे.
या चहाच्या फक्त एका घोटानेच तुम्हाला पूर्णपणे वेगळं काहीतरी अनुभवता येईल. गोल्डन ड्रिंक्स ‘स्वर्ण पनम’ असे या चहाचे नाही. उत्पादकांने या चहाच्या संपूर्ण शुद्धतेचे आश्वासन दिले आहे. हे चहाचे मिश्रण खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे, त्यात 24 कॅरेट खाण्यायोग्य सोन्याच्या बारीक पाकळ्या आणि मधासोबत आसामचा काळा चहा, जो चहाच्या क्लोनच्या उत्तम कोवळ्या पानांपासून बनवलेला आहे, यांचा समावेश आहे.