मुंबई : भारतात काही अशी मंदीर (Ganesh Temple) आहेत, तिथं श्रद्धा आहे. त्याचबरोबर काही मंदीरं देशात अशी आहेत की पाहिल्यानंतर तुमचं मन एकदम खुष होऊन जाईल. त्याचपद्धतीने एक गणेशाचं मंदीर आहे. मंदीर जंगलात आहे, तिथं जाणं प्रत्येकाला शक्य नाही. त्या मंदीराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) अधिक व्हायरल झाला आहे. लोकांनी त्या व्हिडीओला अधिक लाईक केले आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ (Viral Video) छत्तीसगडचा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर ते मंदीर साधारण तीन हजार फूट उंच टेकडीवर आहे.
खरतर, गणेशाचं हे मंदीर छत्तीसगढ़च्या ढोलकल डोंगराच्यावरती आहे. तिथं लोकांची दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली असते. लोकांच्या म्हणण्यानुसार हे मंदीर समुद्राच्या तळापासून तीन हजार फूट उंचीवर आहे. त्याचबरोबर हे मंदीर एक हजार वर्षापूर्वीचं असण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तिथं असलेली गणेशाची मुर्ती ढोलक आकाराची आहे. व्हिडीओत दिसत असलेल्या मूर्तीमध्ये गणेशाने उजव्या हातात एक फारो, वरच्या डाव्या हातात त्याचा तुटलेला दात पकडला आहे. त्यानंतर खाली असलेल्या हातांमध्ये पुष्पहार आणि मोदक दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर _adeeee_thakur750 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, ती लोकं या व्हिडीओच्या खाली कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने ‘लाइव गणेश आरती.’असं म्हटलं आहे.
भारतात अशी असंख्य मंदिर आहेत. तिथं लोकांची श्रध्दा आहे. त्याचबरोबर अनेक अडचणींचा सामना करुन लोकं तिथं दर्शनासाठी जात असल्याचं वारंवार पाहायला मिळालं आहे. अनेकदा अडचणीच्या ठिकाणी जाण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी आजही भक्तांना कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे.