नवी दिल्ली : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना डोळे उघडताच चहा (tea) हवा असतो आणि अशा लोकांची संख्या आपल्याकडे थोडी जास्त आहे. चहा पिण्याबद्दल बोलायचं झालं तर त्यात आपल्या देशाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. आपल्या देशातील 80 टक्के चहा इथले लोक स्वतः पितात. पण या चहाबद्दल एक मिथक आहे जे तुम्ही तुमच्या लहानपणी कधी ना कधी ऐकलेच असेल. आणि ते मिथक म्हणजे चहा प्यायल्याने (drinkingtea) शरीराचा रंग काळा होतो. हे कितपत खरं आहे जाणून घेऊया लहानपणी आपण जेव्हा चहा प्यायचो तेव्हा आई-वडील नेहमी एक गोष्ट सांगायचे, जास्त चहा पिऊ नका नाहीतर काळे व्हाल. पण यात कितपत तथ्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
तुम्हालाही असे वाटत असेल, तर हे जाणून घ्या की असं काहीही नसतं, हे खरं नाहीये. या सर्व गोष्टी केवळ सांगण्यासाठी आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. कारण आपल्या शरीराचा रंग मेलॅनिन (Melanin) जेनेटिक्सवर अवलंबून असतो. त्यामुळे काही लोक गोरे , काही सावळे तर काही काळ्या रंगाचे असतात. या विषयावर संशोधनही झाले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की चहा प्यायल्याने आपल्या रंगावर परिणाम होत नाही. त्यापेक्षा आपण योग्य प्रमाणात चहा प्यायलो तर आपल्या शरीरातील घाण निघून जाते.
मग हे वाचल्यावर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की असे काही घडतंच नसेल तर सलहानपणी चहाबद्दल (रंग काळवंडण्याची) ही गोष्ट का सांगितली जायची? खरंतर हे खोटं, लहान मुलांना व्यसनाधीन होऊ नये म्हणून सांगितलं जायचं कारण चहामध्ये खूप कॅफिन असतं ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. चहाचा आपल्या शरीराला जसा फायदा होतो, तसेच त्यामुळे नुकसानही होतं. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो. मात्र जास्त चहा पिणे शरीरासाठी हानिकारक असते.