मुंबई : सध्याच्या घडीला मोबाईल (Mobile Cover) अशी गोष्ट आहे की, प्रत्येकाला ती गरजेची झालेली आहे. लहान असो किंवा मोठा माणूस त्याला मोबाईल गरजेचा झाला आहे. लोकं ज्यावेळी कोणत्याही कारणाने घरातून बाहेर पडतात, त्यावेळी त्यांच्याकडे मोबाईल हा १०० टक्के असतो. मग प्रत्येक माणूस हा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडला असलातरी त्याच्याकडे मोबाईल पाहायला मिळतो. याच कारणामुळे लोकं मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवतात. समजा ते बाहेर पडताना त्याचं पॉकेट घरी विसरलं, तरी त्यांच्या मोबाईलमधील (mobile news) कव्हरमध्ये असलेल्या पैशांपासून ते पाहिजे ती वस्तू खरेदी करु सुध्दा करतात. तुम्हाला मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणे किती धोकदायक आहे ? हे माहित आहे का ? सध्या व्हायरल (viral video) झालेला एक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीचं मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवणार नाही एवढं मात्र नक्की.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की, मोबाईलच्या कव्हरमध्ये मागच्या बाजूला पैसे ठेवणे किती खतरनाक आहे. त्याचबरोबर आम्ही मोबाईलच्या कवरमध्ये पैसे का ठेवले नाही पाहिजेत हे सुध्दा सांगितलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की, मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवल्याने त्याचा स्फोट होऊ शकतो. आता तुम्हाला असं वाटतं असेल की मोबाईलमध्ये नोट ठेवल्याने स्फोट कसा होऊ शकतो. कारण नोटमध्ये करंट सारखं काहीचं नसतं.
सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, जेव्हा मोबाईल फोन स्पीडने सुरु असतो. त्यावेळी तो गरम होतो आणि तापमान वाढवतो. त्यामुळे मोबाईलकवरमध्ये ठेवलेल्या नोटेला आग लागू शकते. त्याचबरोबर नोट तयार करण्यासाठी विविध प्रकारचं केमिकल वापरलं जातं. त्याचं केमिकलमुळे आग लागण्याची अधिक शक्यता आहे. समजा, तुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल तर सावधान राहा आणि अशी चुकी पुन्हा करु नका.