तेव्हा एक लिटर पेट्रोलच्या किंमतीत मिळायचे एक तोळे सोने हे तुम्हाला माहीती आहे काय ?, दागिन्यांचे जुने बिल होतेय व्हायरल

| Updated on: Feb 18, 2023 | 12:43 PM

सोशल मिडीयावर हल्ली जुनी बिले व्हायरल करण्याचा टेन्ड आहे. आधी बुलेट बाइक, नंतर सायकलचे बिल तर आता 64 वर्षांपूर्वीचे दागिन्यांचे बिल व्हायरल होत आहे.

तेव्हा  एक लिटर पेट्रोलच्या किंमतीत मिळायचे एक तोळे सोने हे तुम्हाला माहीती आहे काय ?, दागिन्यांचे जुने बिल होतेय व्हायरल
GOLD RATE
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : महागाई इतकी वाढली आहे की आता शंभर रूपयात फारसे काही येत नाही. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जीवन एकदम कठीण झाले असताना सोशल मिडीयावर विविध वस्तूंच्या किंमतीचे भाव व्हायरल होत आहेत. त्याकाळातील वस्तूंच्या किंमती पाहून आपल्याला आश्चर्य झाल्यावाचून राहत नाही. काही दिवसांपूर्वी बुलेटचे बिल वायरल झाले होते. त्यानंतर सायकलचे बिल अशाच प्रकारे व्हायरल झाले होते आणि सोन्याचे बिल व्हायरल झाले आहे.

सोशल मिडीयावर सध्या एक जुने सराफाचे बिल व्हायलर होत आहे. सन 1959 चे हे बिल आहे. म्हणजेच हे बिल तब्बल 64 वर्षे जूने आहे. आपण त्याकाळातील सोनाचा दर पाहून चकीत व्हाल. कारण त्याकाळात एक तोळा सोन्यासाठी केवळ 113 रूपये लागायचे. आता या रूपयात काहीच आपण घेऊ शकत नाही. आज दहा तोळासोन्याचा भाव 52 हजाराच्या पुढे गेला आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले बिल हे 3 मार्च 1959 आहे. या बिलावर पुण्याच्या रविवार पेठेतील व्यापारी वामन निंबाजी अष्टेकर यांच्या पेढीचे नाव आहे. तर खरेदीदाराचे नाव शिंवलिंग आत्माराम आहे.

आत्माराम यांनी सोने आणि चांदीचे एकूण 909 रूपयांच्या दागिन्यांची खरेदी केल्याचे दिसत आहे. हे दागिने खरेदीची पावती खूपच व्हायरल होत आहे. या बिलाला पाहून प्रत्येक जण अचंबित होत आहेत. लोकांचे म्हणणे आहे ते दिवस खरोखरचे अच्छे दिन थे होते असे लोकांनी म्हटले आहे. काहीनी म्हटले आहे की त्या वेळेच्या 113 रुपयांची किंमत आज पन्नास हजाराच्या बरोबर आहे. या बिलावर अनेक जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. तुमच्या प्रतिक्रीया नेमक्या काय आहेत हे येथे कळवाव्यात असे आवाहन करण्यात येत आहेत.