Video: वाद घालू नको, माघार घे…सुखी संसारासाठी बापाचा पोरीला सल्ला, व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या उड्या

| Updated on: Sep 17, 2022 | 10:46 AM

आसान है नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या व्हिडीओ तोच विदाईचा क्षण दाखवण्यात आला आहे

Video: वाद घालू नको, माघार घे...सुखी संसारासाठी बापाचा पोरीला सल्ला, व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या उड्या
विदाईवेळी बाप आणि मुलीचा संवाद
Follow us on

लग्नानंतर सासरी (Vidai Video) जातानाचा क्षण हा सर्वात भावूक. त्यावेळी बापाच्या आणि पोरीच्या (Father and Daughter Video) डोळ्यात पाणी नाही आलं तर नवलंच. अख्ख्या लग्नमंडपात यावेळी शांताता पसरते, रडण्याचा आवाज आला नाही असं होत नाही. ज्या पोरीला अंगाखांद्यावर वाढवलं, तिचे सगळे नखरे सहन केले, ती पोरगी उद्यापासून परकी होणार हा विचार भावूक करणारा आहे. मात्र आता एक असा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय, ज्यातून हा क्षण किती आनंदाचा आहे, आणि एक बाप पोरीसाठी काय काय विचार करु शकतो हे कळतं. इन्स्टाग्रावर या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळत आहेत.

‘आसान है’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या व्हिडीओ तोच विदाईचा क्षण दाखवण्यात आला आहे, जिथे बाप आणि पोरगी भावूक होत असतात. मात्र ही परिस्थिती थोडी वेगळी आहे. इथं बाप आपल्या पोरीला जगण्याची तत्त्व समजावून सांगत आहे. सुखी संसार कसा करावा, याहून चांगलं कुणीही सांगू शकत नाही

हे सुद्धा वाचा

कुठल्याच वादात जिंकण्याचा प्रयत्न करु नको, प्रत्येक वादा हारशील तर जीवनात जिंकशील. कधीच विचार करु नको, बापाचं घर सुटलं आहे, बापाचं घर कधी सूटत नाही. कुठलाही वाद झाला तर तो वाद संपवल्याशिवाय झोपू नको,त्या वादाला संपवण्याकडे ने, आणि जेव्हा तो वाद संपत असेल तेव्हा त्या वादात हार मान. तू जीवनात जिंकशील.

पाहा व्हिडीओ:

बापाचा हा मोलाचा सल्ला खरंच अंगिकारण्यासारखा असल्याचं मत अनेक नेटकरी व्यक्त करत आहेत. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर तब्बल अडीच लाख लोकांनी लाईक केलं आहे. बापाचे सर्वात चांगले शब्द या नावाखाली हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

खरंच बापाने मुलीला दिलेला सल्ला सर्वांनी ऐकण्यासारखा आहे. बाप जेव्हा मुलीला हे सगळं सांगत असतो, त्यावेळी नवरामुलगाही तिथेच आहे. त्यामुळे हे शब्द त्याच्याही कानावर पडत आहेत.