मॉलमध्ये मॅनेक्वीन म्हणून उभी राहिली आणि व्हायरल झाली; व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Jul 08, 2024 | 3:42 PM

आपला धंदा वाढवण्यासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही. पण हे करताना आपण नीतीमूल्य पायदळी तुडवत आहोत, याचं भान त्यांना राहत नाही. दुबईच्या एका मॉलमध्ये असाच काही प्रकार घडला आहे. या मॉलमध्ये पुतळ्याच्या जागी चक्क एका तरुणीला उभं करण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियामध्ये यावरून वाद निर्माण झाला आहे.

मॉलमध्ये मॅनेक्वीन म्हणून उभी राहिली आणि व्हायरल झाली; व्हिडीओ तुफान व्हायरल
Image Credit source: social media
Follow us on

जगात उद्योग वाढवण्यासाठी लोक काय काय उद्योग करतील हे सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, एका मॉलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मात्र, सोशल मीडियातून या मॉलवर प्रचंड टीका केली जात आहेय त्याला कारणही तसंच घडलंय. एका तरुणीला मॉलमधील कपड्याच्या दुकानात पुतळ्यासारखं उभं करण्यात आलं. हा व्हिडीओ दुबईचा असल्याचं सांगितलं जातं. काही सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण या व्हिडीओमुळे यूजर्स भडकले आहेत. हे अमानवी आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे. तसेच हा व्हिडीओ म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की आधुनिक गुलामी? असा सवालही केला जात आहे.

हा व्हिडीओ दुबईच्या फेस्टिव्हल सिटी मॉलचा आहे. हा व्हिडीओ स्टोअर समोर उभ्या राहणाऱ्या मॉडेलनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट @angelina.a_ वर शेअर केला आहे. यात एंजेलिना नावाच्या मॉडेलला Manto Bride च्या स्टोअरमध्ये पुतळ्यासारखं उभं केलेलं पाहू शकता. ही मॉडेल वेगवेगळ्या पोज देऊन ग्राहकांना आकर्षित करताना दिसत आहे. ग्राहकही या मॉलजवळून येताना आणि जाताना दिसत आहेत. एंजेलिनाने हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर एक वाक्य लिहिलंय. दुबईत मार्केटिंग असं तिने लिहिलं आहे.

हजारो व्ह्यूज, शेकडो लाइक्स

या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाल्या असून शेकडो लोकांनी लाइक केला आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक कमेंटही होत आहेत. काही सेकंदाच्या व्हिडीओने इंटरनेटवर मार्केटिंग स्ट्रॅटेजीवरून वाद सुरू केला आहे. काही लोकांना ही कल्पना अत्यंत आधुनिक आणि वेगळी वाटत आहे. तर काही यूजर्सने ही कल्पना म्हणजे बौद्धिक दारिद्र्य  असल्याचं म्हटलं आहे. ही आधुनिक गुलामी असून हे अमानवीय आहे, अशी कमेंट काही लोकांनी केली आहे.

 

कपडे तरी नीट…

पैशासाठी हे मॉडेलने केलं असेल. त्यावर ती काही म्हणत नसली तरी हा अमानवी प्रकार आहे. तिच्या पायाला किती वेदना होत असतील हे तिच सांगू शकते, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. तर स्वत:ची लाज घालवण्यासाठी आधुनिक जगातील लोक नवीन नवीन गोष्टी शोधत असतात, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. तर एकाने थेट हा काही नाईट क्लब नाहीये. त्यामुळे इथे अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज काय? मॉलमध्ये कुटुंब येत असतं. लहान मुलं असतात. त्यांच्यावर काय परिणाम होईल? कमीत कमी कपडे तरी व्यवस्थित घालायचे, असं त्याने म्हटलं आहे.