मुंबई : सोशल मीडियावर रोज नवे व्हिडीओ (social media) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते कितीहीवेळा पाहिले तरी लोकांना वारंवार पाहावेसे वाटतात. सध्या सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ व्हायरल (Emotional Viral Video)झाला आहे. या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं आहे. नुकताचं असा प्रेम करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष खेचत आहे.
अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. वयोवृध्द पती-पत्नी यांच्यामध्ये अधिक वय झाल्यानंतर सुध्दा किती प्रेम आहे याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका ट्रेनमधील आहे. त्या व्हिडीओमध्ये दोघेही वयोवृध्द चेहरा पडलेल्या व्यक्ती दिसत आहेत. ट्रेनमध्ये सुध्दा पती आपल्या पत्नीची काळजी घेत आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती राकेश मैनी नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. दोन वयोवृध्द व्यक्ती रेल्वेने प्रवास करीत आहेत. वयोवृध्द पत्नी आजारी असल्यामुळे वयोवृध्द पती काळजी घेत आहे. त्याचबरोबर आपल्या हाताने जेवण भरवत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी चांगल्या कमेंट केल्या आहेत.
हा व्हिडीओ आतापर्यंत सोशस मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे. बातमी लिहिपर्यंत 3 लाख 91 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले होते. हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘या वयातलं प्रेम खरंच सुंदर आहे, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी सहनशीलतेची परीक्षा सोपी नाही.’ त्याच वेळी, मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी याचे वर्णन अतिशय गोंडस आणि हृदय जिंकणारा व्हिडिओ म्हणून केले आहे.