मुंबई : सोशल मीडियावर (Amazing Viral Video) लोकांचं मन जिंकणारे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Trending video) झाला आहे. त्याने सुध्दा लोकांचं मन जिंकलं आहे. त्या व्हिडीओमध्ये एका वयोवृ्द्ध व्यक्तीचा बायकोचा मृत्यू झाला आहे. तरी सुध्दा त्यांचं आपल्या बायकोवरती किती प्रेम आहे. हे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक वयोवृद्ध व्यक्ती त्यांच्या दिवगंत पत्नीच्या फोटोला सरबत पाजत असल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने अनेकांना रडवलं सुध्दा आहे.
सोशल मीडियावर आपल्याला काही व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये वयोवृद्ध कपल एकमेकांसोबत खूष असल्याचे पाहायला मिळते. नेटकरी अशा व्हिडीओंना खरं प्रेम म्हणतात, तसेच खरे जीवनसाथी असंही म्हणतात. काही लोकांनी या व्हिडीओला अधिक पसंत केले आहे. सध्याचा व्हिडीओ लोकांचा फेवरेट झाला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती गुरपिंदर संधू नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक वयोवृध्द व्यक्ती रस्त्यावर सरबत पीत आहे. सायकलवरती बसलेली व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या दिवगंत पत्नीच्या फोटोला पहिल्यांदा सरबत लावतो, नंतर तो सरबत पितो.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला ११ लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर 16 मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून लोक खरं प्रेम म्हणत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आमचे आई-वडील शेवटच्या पिढीचे आहेत, ‘इतके प्रेमळ’. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत.