Video | वयोवृद्ध महिलेने वेगाने मोटरसायकल चालवली, व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला

| Updated on: May 21, 2023 | 1:17 PM

Viral Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक वयोवृध्द महिला अधिक वेगाने गाडी चालवत आहे.

Video | वयोवृद्ध महिलेने वेगाने मोटरसायकल चालवली, व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला
Elderly Woman Ride Motorcycle
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांचे लक्ष खेचून घेत असतात. सध्या अशाचं पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्यामध्ये महिला एका बाईकवरुन जात आहेत. त्यामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की, वयोवृध्द महिला बाईक (Elderly Woman Ride Motorcycle) चालवत आहे. महिलेचे मोटारसायकल चालवणं पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

वयोवृध्द महिलेसोबत आणखी एक बाई त्या गाडीवरती बसली आहे. दोन्ही महिला मोटारसायकलवरती मजा घेत आहेत. हा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की एक वयोवृध्द महिला एकदम स्पीडमध्ये बाईक चालवत आहे. मागच्या बाजूला बसलेली महिला प्रवास करीत आनंद घेत आहे. ज्यावेळी एक व्यक्ती हा व्हिडीओ तयार करीत होता. त्यावेळी दोन्ही महिला त्या व्यक्तीला हाताने इशारा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

१० लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला

हा व्हिडीओ शबीर जायद याने आपल्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ १० लाख लोकांपेक्षा अधिक पाहिला देखील आहे. काही इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी मोटारसायकल चालवत असलेल्या महिलेचं कौतुक देखील केलं आहे. त्या व्यक्तीने अशी गोष्ट मोबाईलमध्ये कॅप्चर केली आहे की, सगळी त्या व्यक्तीचं सुध्दा कौतुक करीत आहेत.

वय ही फक्त एक संख्या आहे

सध्या चांगले व्हिडीओ खूप कमी पाहायला मिळतात. हा व्हिडीओ आज तुमचा दिवस चांगला घालवेल एवढं मात्र निश्चित. या व्हिडीओची तारिफ करताना एका व्यक्तीने लिहीले आहे की, वय हा फक्त नंबर आहे. त्यामुळे तुमच्या वयाला संख्येमध्ये कधीही बांधू नका. आयुष्याची भरपूर मजा घ्या.