नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : जगभरात भारताचा दबदबा वाढत चालला आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 चे लॅंडीगं केल्यानंतर भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. एकेकाळी साप आणि गारुड्यांचा देश म्हणून हीनवले जाणाऱ्या भारताला आता मानसन्मान मिळत आहे. जगातील गुगलपासून ते युट्युबपर्यंत जगातील बड्या टेक्नॉलॉजी कंपन्याच्या सीईओपदी भारतीय वंशाचे लोक विराजमान झाले आहेत. भारतीय वंशाचे तरूण लाखो डॉलरची कमाई करीत आहेत. यावर टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे सीईओ इलोन मस्क यांनी देखील व्यक्त केलेली प्रतिक्रीया पाहून भारतीयांची मान उंचावली आहे.
भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर इलोन मस्कही प्रभावीत झाले आहे. त्यांनी भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचाही सीईओ असल्याचे म्हटले आहे. जेव्हा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्सने एक्सवर ( आधीचे ट्वीटर ) प्रमुख कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अधिकारी असल्याची यादी पोस्ट केली आहे. त्यावर शनिवारी रात्री उशीरा इलोन मस्क यांनी प्रभावशाली इम्प्रेसिव्ह अशी प्रतिक्रीया दिली आहे.
ट्वीटरची पोस्ट पाहा –
CEO of Alphabet Google 🇮🇳
CEO of Microsoft 🇮🇳
CEO of YouTube 🇮🇳
CEO of Adobe 🇮🇳
CEO of World Bank Group 🇮🇳
CEO of IBM 🇮🇳
CEO of Albertsons 🇮🇳
CEO of NetApp 🇮🇳
CEO of Palo Alto Networks 🇮🇳
CEO of Arista Networks 🇮🇳
CEO of Novartis 🇮🇳
CEO of Starbucks 🇮🇳
CEO of Micron Technology…— World of Statistics (@stats_feed) August 26, 2023
सध्या मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ संजय मेहरोत्रा, एडोबचे सीईओ शंतनु नारायण, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला, अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, जस्केलरचे सीईओ जय चौधरी, आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा, युट्युबचे सीईओ नील मोहन, नेटएपचे सीईओ जॉर्ज कुरियन आहेत. तर फ्रान्सचे लक्झरी हाऊस चॅनलच्या सीईओ लीना नायर, स्टारबक्सचे सीईओ लक्ष्मण नरसिम्हन आहेत. ओन्लीफॅन्सचे सीईओ आम्रपाली अमी, विमिओचे सीईओ अंजली सूद, वीएमवेअरचे सीईओ रंगराजन रघुराम आहेत.