Elon Musk | जगातील धनाढ्य व्यक्ती एलन मस्कच्या (Elon Musk) शर्टलेस फोटोंवर (Shirtless Photo) नेटिझिन्सने अफलातून प्रतिक्रिया दिल्यानंतर मागे हटेल तो मस्क कसला? तो या टिकाकारांच्याही पुढे आहे. त्याने अफलातून प्रतिक्रिया दिली आहे. बॉडीशेमची कॉमेंट (Body Shame Comment)करणाऱ्यांना उत्तर देताना त्याने आपण हजारदा शर्ट काढणार असल्याचे गंमतीशीर उत्तर दिले. कायम बातम्यांच्या केंद्रस्थानी असणारा मस्क काहींना काही अफलातून करण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना तो जे काही करतो त्याची चर्चा होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता या पठ्ठ्याने कुठे तरी सुट्टी घालवताना शर्ट काय काढले नी त्याचे फोटो व्हायरल झाले काय? त्यावर कॉमेंट्सचा पाऊस पडला. या कॉमेंटसमध्ये नेटिझन्सनीने मस्कवर टीका केली असली तरी ती गांभीर्याने न घेता त्याने खेळाडूवृत्तीने (Sportily) त्याला उत्तर दिले. एका कॉमेंटला उत्तर देताना तर त्याने मी हजरदा शर्ट काढले, असे म्हणत टीकाकरांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
एलोन मस्क या आठवड्याच्या शेवटी सुट्टीवर होता. हा अब्जाधीश रविवारी मित्रांसह ग्रीसमधील मायकोनोस येथे एका आलिशान नौकेवर दिसला. ज सिक्सने प्रथम टेस्ला आणि स्पेसएक्स सीईओचे शर्टलेस शॉट्स प्रकाशित केले. या ट्रिपमधील त्याचे शर्टलेस फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. मग काय या पठ्ठ्याच्या आणि नेटिझिन्सच्या कल्पकतेला धुमारे फुटले. त्याच्याबद्दल कॉमेंट्सचा पाऊस पडला. खुद्द मस्कही या फोटोंच्या कॉमेट्सपासून अलिप्त राहिला नाही. त्यानेही या कॉमेंटसवर मनसोक्त प्रतिक्रिया दिल्या.
यातील एका ट्विटर वापरकर्त्याने टेस्लाकॉनॉमिक्स या शर्टलेस मस्कचा यॉटवर ड्रिंक करतानाचा फोटो ट्विट केला आणि लिहिले, ” होय, मला या माणसाच्या मागे माझे डॉलर मिळाले. तसेच इतर अनेक स्मार्ट गुंतवणुकदारांनही कमाई केली.” त्याच्या या चाहत्याला तेव्हा जास्तीचा सूखद धक्का बसला, जेव्हा मस्कने त्याला मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘आता मला यासाठी अनेकदा शर्ट उतरावे लागेल आणि उघडा रहावे लागेल’, अशी प्रतिक्रिया मस्कने त्याला दिली. इतर अनेक जणांनीही ट्विटरवर मस्कला प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Never in my life have I seen a physique like this pic.twitter.com/w1OYO4NSYj
— syn (@0xSynsitive) July 18, 2022
दरम्यान या थट्टामस्करीत एक गोष्ट जी मस्कच्या कायम मागे असते ती म्हणजे वाद. आता हा वाद तर त्यानेच स्वतःच ओढावून घेतला आहे. मस्कला ट्विटरसोबतच्या कायदेशीर लढाईत कंपनी विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरच्या करारावर मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी, 19 जुलै रोजी डेलावेअर चॅन्सरी कोर्टाने मस्कच्या अधिग्रहणातून मागे हटण्याच्या प्रयत्नाबद्दल ट्विटरला त्वरीत खटला चालविण्याची विनंती मंजूर केली. मस्कच्या वकिलांनी हा खटला पुढे ढकलण्याची केलेली विनंती काही उपयोगी पडली नाही. त्यांचा युक्तीवाद न्यायालयासमोर टिकला नाही.