VIDEO | गायीचा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर इंजिनिअर सुद्धा सलाम करतील, खुंटी अशा प्रकारे उपटली की….

| Updated on: Jun 18, 2023 | 11:00 AM

Cow Viral Video | हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक गाय रोवलेली खुंटी कशा ज्या पद्धतीने काढत आहे. ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

VIDEO | गायीचा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर इंजिनिअर सुद्धा सलाम करतील, खुंटी अशा प्रकारे उपटली की....
viral news in marathi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्या एका गाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Cow Viral Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर (trending video) तुम्हाला हसू आवरणार नाही असा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओमध्ये एक गाय दिसत आहे. त्या गाईला खुंटीला बांधलं आहे, ती खुंटी लोखंडाची आहे. त्या खुंटीच्या आजूबाजूने गाई फिरते. हा व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यापासून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडल्यामुळे त्यांनी शेअर सुध्दा केला आहे. व्हिडीओ पाहि्ल्यानंतर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की, गाईला अशा पद्धतीने खुंटी काढण्यासाठी ट्रेनिंग दिलं आहे.

खुंटी काढल्यामुळे गाईचा व्हिडीओ व्हायरल

त्या व्हिडीओला शेअर करताना कॅप्शन लिहीलं गेलं आहे की, इंजिनिअर पदवी आणि गाई, त्या व्हिडीओत गाईला एका मोठी दोरी खुंटीला बांधलं आहे. पहिल्यांना गाय लांबून खुंटी काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी गाईला ती खुंटी निघत नाही. मग ती गाई जुगाड करते आणि तो खुंटा काढते. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण हसत आहेत.

हे सुद्धा वाचा

खुंटा काढण्यासाठी गाईचा जुगाड

खुंटा काढण्यासाठी गाई त्या दोरीला आपल्या शिंगात अडकवते. त्यामुळे ती दोरी एकदम छोटी झाली आहे. त्यामुळे गाईला तो खुंटा काढणं अधिक सोप्पं होतं. ज्यावेळी तो खुंटा निघतो, त्यावेळी ती गाई इकडं तिकडं फिरु लागते. तिथं असलेल्या व्यक्तीनं हा व्हिडीओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

तिथं फिरु लागली गाय

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या गाईने किती डोकं वापरलं असेल असं तुम्हाला वाटतं असेल ? सोशल मीडियावर असे व्हिडीओ कायम पाहायला मिळतात. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हसू थांबलेलं नाही. या व्हिडीओमध्ये गाईच्या बाजूला चारा दिसत आहे. खुंटा काढल्यानंतर ती गाई आझाद झाली आहे, जमिनीवर पडलेल्या काही गोष्टी ती खाण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे खुंटा काढल्यानंतर ती गाय शांत झाली आहे.