दिल्ली : मेट्रोच्या डब्यात तरुण आणि तरूणी आपल्या मोबाईलचा वापर करीत रिल्स ( reels ) तयार करीत आहेच. या मेट्रोच्या डब्यात अलीकडे टीएटर पिढी रिल्स बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सहप्रवाशांना या गोष्ठींचा त्रास होत असतो. या प्रकारावर दिल्ली मेट्रो प्रशासनाने ‘मिम्स’द्वारे ( MEME ) मार्मिक टीप्पणी केली आहे. त्यासाठी ( RRR ) ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या लोकप्रिय ‘नाटु-नाटु’ गाण्याचा वापर केला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविणारा आणि ऑस्करच्या शर्यतीतील चित्रपट ‘आरआरआर’ मधील ‘नाटु-नाटु’ या गाण्याची क्रेझ आता मेट्रो प्रशासनालाही पडली आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन ( DMC ) हे दिल्लीतील सर्वात गर्दी होणारी मेट्रो गेली तीन दशके चालवित आहेत. या मेट्रोने लाख प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. परंतू या मंडळींनी रिल्स शूट करण्यासाठी केलेल्या डान्समुळे इतर प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. या प्रकरणामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी तक्रारही केल्या आहेत. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने इन्स्टाग्रामवर एक मिम्स शेअर करून त्यांचे प्रबोधन केले आहे.
या मिम्समध्ये मेट्रोने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविणारा आणि ऑस्करच्या शर्यतीतील चित्रपट ‘आरआरआर’ मधील नाटु-नाटु या गाण्यांचा वापर केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘डान्स इज फन, बट दिल्ली मेट्रो में ना- नाचो, नाचो, नाचो’ असे शीर्षक दिले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये या चित्रपटाच्या गीताचा व्हिडीओतील अभिनेत्याचा फोटोही पोस्ट केला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये, ‘रिमेंबर टू रिस्पेक्ट युअर पॅसेंजर’ ‘दिल्ली मेट्रो’ असे म्हटले आहे.
दिल्ली मेट्रो प्रशासनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या पोस्टला 851 लोकांनी लाईक्स केले आहे. यास एका युजर्सने म्हटले आहे की अशा जागरूकता पसरविणाऱ्या पोस्ट गरजेच्या असून प्रशासानाने भविष्यातही अशा पोस्ट टाकाव्यात म्हटले आहे. इतर अनेक इंटरनेट युजर्सने हार्ट आणि क्लॅपचे इमोजी शेअर केले आहेत.